LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले असून, याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. एलपीजी गॅसच्या वाढत्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, केंद्र सरकारने एक दिलासादायक पाऊल उचलले आहे. विशेषतः विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगारांची सोय लक्षात घेऊन सरकारने ५ किलोच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा आता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक संकटामुळे उद्भवलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने हा 'डबल सिलिंडर'चा कोटा लागू केला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा रोजंदारीवर काम करणारे मजूर, शहरात राहणारे विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त स्थलांतर करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेली ओढाताण कमी करण्यासाठी आणि गरजूंपर्यंत इंधन पोहोचवण्यासाठी सरकारने ही यंत्रणा अधिक गतीमान केली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आधार मिळाला आहे.



५ किलो सिलिंडरचा कोटा दुप्पट


राज्यांमध्ये निर्माण झालेली सिलिंडरची पळापळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ५ किलोच्या छोट्या गॅस सिलिंडरचा कोटा दुप्पट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना तातडीने पत्र पाठवण्यात आले असून, सिलिंडरचे दैनंदिन वाटप वाढवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता सामान्य नागरिकांना सिलिंडरसाठी वणवण करावी लागणार नाही.



स्थलांतरित आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय


आता स्थलांतरित कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांना गॅस कनेक्शनसाठी पत्त्याच्या पुराव्याची (Address Proof) अट राहणार नाही. केवळ आपले ओळखपत्र दाखवून ५ किलोचा 'एफटीएल' (FTL) सिलिंडर सहज खरेदी करता येणार आहे, ज्यामुळे कागदपत्रांच्या कटकटीतून त्यांची मुक्तता झाली आहे. या योजनेतंर्गत, केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत या छोट्या सिलिंडरचा साठा उपलब्ध करून देत आहे. तेल विपणन कंपन्यांमार्फत थेट वितरण केले जाणार असल्याने, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आणि बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा गॅस वेळेवर मिळणे सोपे होणार आहे. जागतिक संघर्षाचा फटका सर्वसामान्यांच्या चुलीला बसू नये, यासाठी सरकारने वितरणाची ही नवीन आणि सोपी व्यवस्था तातडीने कार्यान्वित केली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा