सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार


मुंबई : महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि अनधिकृत मासेमारीला पूर्णपणे लगाम घालण्यासाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी दिले.


मंत्रालयात आयोजित मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सागरी सीमांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन हा सर्वात प्रभावी पर्याय ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ च्या कठोर अंमलबजावणीसाठी गस्ती नौकांसोबतच या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.


दरम्यान, सागरी सुरक्षेचा आढावा घेताना मंत्री राणे यांनी किनारपट्टीवरील ९१ अतिसंवेदनशील 'लँडिंग पॉईंट्स'वर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या. या केंद्रांवर 'महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा'मार्फत सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच, 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'अंतर्गत 'सागर मित्र' नेमणुकीच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.



कोळंबी पालनासाठी नवे धोरण


राज्यात कोळंबी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'भूपट्टा धोरण' आणि भूवाटपाचा आराखडा तयार करण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कोळंबी पालन विकासासाठी प्राधान्यक्रमाचा कार्यक्रम निश्चित करून त्याद्वारे मत्स्योद्योगाला व्यावसायिक उभारी देण्याचा सरकारचा मानस आहे. या बैठकीला 'सिबा' कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.



रिक्त पदे लवकरच भरणार


मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामाचा व्याप पाहता, नवीन आकृतीबंधानुसार तातडीने कर्मचारी भरती प्रक्रिया राबवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि नव्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी रिक्त पदे भरण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार