Iran-US Peace Treaty : ४० दिवसांच्या संघर्षाची २१ तास चाललेली चर्चा निष्फळ; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली बहुचर्चित शांती चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे. जवळपास २१ तास चाललेल्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते, मात्र या २१ तासांच्या चर्चेमधून कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकला नाही.


विशेष म्हणजे, तब्बल ४७ वर्षांनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात समोरासमोर चर्चा झाली. या बैठकीत सुरक्षा, लष्करी, राजकीय, आर्थिक आणि कायदेशीर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. इराणच्या बाजूने संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ (Mohammad Bagher Ghalibaf) यांनी नेतृत्व केले. चर्चेपूर्वी इराणने पाकिस्तानच्या मध्यस्थीने काही महत्त्वाच्या अटी मांडल्या होत्या. जसं की, लेबनॉनवरील हल्ले थांबवणे, होर्मूझ सामुद्रधुनी (Strait of Hormu वरील नियंत्रण, युद्धभरपाई आणि गोठवलेल्या मालमत्तेची मुक्तता. मात्र, विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावरून तणाव कायम राहिला.



इराणचा करार अटींना नकार :


अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स (J. D. Vance) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही प्रामाणिक हेतूने चर्चेसाठी आलो होतो, पण इराण कराराच्या अटी मान्य करण्यास तयार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, ते आता अमेरिकेला परत जात असून संपूर्ण परिस्थितीची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना देणार आहेत. दुसरीकडे, अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा फिस्कटल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.





ही परिस्थिती इराणसाठी अधिक नुकसानकारक ठरू शकते :


व्हान्स यांनी सांगितले की, “कोणताही करार होऊ शकला नाही, आणि ही परिस्थिती इराणसाठी अधिक नुकसानकारक ठरू शकते.” त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेचे कौतुक करत म्हटले की, मध्यस्थ म्हणून त्यांनी दोन्ही देशांमधील दरी कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.


दरम्यान, चर्चा सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर टीका करत त्याला “अपयशी देश” असे संबोधले. तसेच, अमेरिकेकडे प्रचंड तेलसाठा असल्याचा दावा करत, Strait of Hormuz लवकरच खुली होईल, असा विश्वास व्यक्त केला.


या चर्चेच्या अपयशानंतर पुढे अमेरिका कोणती भूमिका घेणार आणि या तणावाचे रूपांतर संघर्षात होणार का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही