Bihar : नितीश राजीनामा देणार, बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार

नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या (१४ एप्रिल) आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजीनाम्यापूर्वी उद्या दुपारी २ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल, जो पुढील मुख्यमंत्री असेल. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, ज्यामध्ये नितीश कुमार नव्या मुख्यमंत्रीपदासाठी नाव प्रस्तावित करतील.


नितीश कुमार राजभवनात जाऊन अधिकृतपणे राजीनामा सादर करतील. त्यानंतर एनडीएच्या नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे सादर केला जाईल. शपथविधी सोहळा पटना येथील लोकभवनात आयोजित करण्यात येणार असून, राज्यपाल कार्यालयाने तयारीला सुरुवात केली आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नव्या सरकारमधील पक्षाची भूमिका आणि उपमुख्यमंत्री पदाविषयी चर्चा झाली. या बैठकीत संजय झा, ललन सिंह, जमा खान आणि बिजेंद्र यादव यांसारखे नेते उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार