Kalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार तर एक गंभीर जखमी

कल्याण-अहिल्यानगर (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) महामार्गावर आज म्हणजेच सोमवार १३ एप्रिल रोजी अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातात एका ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.



ईको कारचा पूर्णपणे चक्काचूर :


मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) तीव्रता इतकी होती की ईको कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. धडक इतकी जोरदार होती की कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. मृतांमध्ये कल्याण ते मुरबाड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु :


अपघाताचा (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले, तर गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


प्राथमिक तपासानुसार हा अपघात (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) महामार्गावरील एका पुलावर घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासही सुरुवात झाली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने