Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी शक्ती असल्याचं भासवून एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


आरोपीनं केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडित महिलेकडून तब्बल ५० लाख रुपये देखील उकळले आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी औदुंबर मनोहर गडदे याचा शोध सुरु आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कौटुंबिक वादामुळे पतीपासून वेगळी राहत होती. तिच्या याच मानसिक परिस्थितीचा आणि असहायतेचा फायदा आरोपी औदुंबर गडदे यानं घेतला.


आपण 'देवऋषी' असून आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचं त्यानं महिलेला पटवून दिलं. एवढेच नव्हे तर आरोपीनं पीडितेवर विश्वास संपादन केल्यानंतर तिला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावलं आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर या आरोपीनं तिला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नेलं आणि तिथेही तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.



आरोपीनं अत्याचारासोबतच पीडितेला ५० लाखांचा गंडा देखील घातला. आपल्यासोबत फसवणूक आणि अत्याचार झाल्याचं लक्षात येताच महिलेनं धाडस करून पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपी औदुंबर मनोहर गडदे विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

Comments
Add Comment

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने