Iran - India : हॉर्मूझ सामुद्रधुनीचा प्रवास भारतासाठी 'टोल फ्री'; पुन्हा एकदा इराणकडून भारताशी मजबूत संबंध अधोरेखित

इराण अमेरिका यांच्यातील शांती करार निष्फळ ठरल्यानांतर इराणकडून हॉर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी टोल आकारण्यात आला. मात्र इराणने सोमवारी (१३ एप्रिल) ठामपणे स्पष्ट केले की, हॉर्मूझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणत्याही प्रकारचा टोल आकाराला जाणार नाही. त्यांच्या या निर्णयातून पुन्हा एकदा इराणने भारताशी असलेले “चांगले संबंध” संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.


गेल्या काही दिवसांपासून भारतीय जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी इराणने भारताकडून पैसे घेतले अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर नवी दिल्लीतील इराणी दूतावासात झालेल्या पत्रकार परिषदेत फथाली यांनी सांगितले, “आत्तापर्यंत आम्ही भारताकडून कोणतेही शुल्क घेतले आहे का, हे तुम्ही भारतीय सरकारलाच विचारू शकता.” असं म्हणत त्यांनी भारतीय जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी पैसे देण्यात आल्याच्या दाव्यांना स्पष्टपणे फेटाळले.


दरम्यान, युद्धानंतर काही प्रमाणात वाहतुकीवर निर्बंध आल्याने भारताच्या सुमारे १५ जहाजे पर्शियन आखातात अडकून असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच एलपीजी वाहतूक करणाऱ्या ९ जहाजांना बाहेर काढण्यासाठी टोल भरल्याच्या बातम्यांनाही भारताने नाकारले आहे.



फथाली यांनी भारताला “विश्वासू भागीदार” संबोधत दोन्ही देशांतील संबंध मजबूत असल्याचे सांगितले. “या कठीण काळातही आमचे संबंध चांगले आहेत. भारत आणि इराणचे हितसंबंध समान आहेत,” असे त्यांनी नमूद केले. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भारताला मैत्रीपूर्ण देशांच्या यादीत स्थान दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हॉर्मूझ सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ऊर्जा मार्ग असून, देशाच्या जवळपास निम्म्या कच्च्या तेल आणि एलपीजी आयातीचा पुरवठा याच मार्गाने होतो.


याशिवाय, इराणने अमेरिकेसोबत पुन्हा चर्चेसाठी तयारी दर्शवली असून, “बेकायदेशीर अटी” टाळल्यास संवाद शक्य असल्याचे संकेत दिले आहेत. इस्लामाबादमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी बंदरांवर नाकेबंदीची धमकी दिल्यानंतर तणाव वाढला आहे. मात्र, हॉर्मूझ सामुद्रधुनी इराणच्या हद्दीत असल्याचा पुनरुच्चार करत इराणने आपली भूमिका अधिक ठाम केली आहे.

Comments
Add Comment

BRICS Summit 2026 : ब्रिक्स परिषदेसाठी गुटेरेस भारतात येणार; पुतिन, पेजेशकियन आणि जिनपिंगही येण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो

malaria preventive medicine : मलेरिया प्रतिबंधात्मक औषध घेतल्याने 53 विद्यार्थी रुग्णालयात, 7 वर्षीय बालिकेचा मृत्यू

भद्राचलम : आंध्र प्रदेशातील पोलावरम जिल्ह्यातील गोल्लागुप्पा गावात मलेरियावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून

Ram Mandir Trust : निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिर ट्रस्टचे पहिले सीईओ नियुक्त

प्रशासकीय कामकाज अधिक मजबूत आणि सुव्यवस्थित करण्यासाठी, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने निवृत्त एअर

Kedarnath helicopter booking 2026 : केदारनाथ हेलिकॉप्टर सेवेसाठी ७ सप्टेंबरपासून बुकिंग विंडो उघडणार

डेहराडून : चारधाम यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात केदारनाथ धामला जाणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा १५

John Ternus Apple CEO : ‘ॲपल’मध्ये नव्या युगाची सुरुवात! नवीन CEO जॉन टर्नस आणि टिम कूक यांच्या पगाराचा आकडा जाहीर

दिग्गज तंत्रज्ञान कंपनी ‘ॲपल’ने (Apple) आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर मोठा बदल केला असून टिम कूक (Cook)

Haryana News : यमुनेच्या पात्रात आर्मीची बोट उलटली अन् स्पेशल फोर्सेसचे दोन जवान बेपत्ता!

हरियाणा : हरियाणातील यमुनानगर (Hariyana Yamunanagar) जिल्ह्यातील हथणीकुंड बॅरेजवर (Hathnikund News) मंगळवारी रात्री एक अत्यंत दुर्दैवी