Mumbai Crime : मुंबई हादरली! एकाच दिवशी तीन खून आणि आरोपी पोलिसांच्या.....

मुंबई : राज्याच्या राजधानीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन खून झाल्याने मुंबई हादरली आहे. काही मोठ्या घटनांमुळे नाही तर छोट्या गोष्टींमुळे झालेल्या या घटनांमुळे माणसाचा राग किती टोकाला जाऊ शकतो, आणि त्या रागाच्या भरात माणूस जीवही घेऊ शकतो, हेच यातून स्पष्ट होते आहे. मुंबईतील दादर, माटुंगा, खेरवाडी परिसरात या घटना घडल्या असून संबंधित परिसरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.




हत्येची कारणं


दादर : पत्नीसमोरच पतीचा केला खून

पूर्ववैमनस्यातून दादरमध्ये पत्नीसमोरच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हाती आलेल्या माहितीनुसार, अंकुश आंबेकर ( २८ ) या तरुणाचा गौरव सनस याच्याशी जुना वाद होता. एकूण सात जणांनी मिळून अकुंशला बेदम मारहाण केली. पत्नीने गौरवला केईएम रुग्णालयात नेले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


माटुंगा : पार्किंगच्या वादातून एकाची हत्या


छोटासा वाद किती मोठं टोक गाठू शकतो हे या हत्येवरून कळत आहे. नरेश वाघेला ( ६५ ) असे मृत व्यक्तीचे नाव असून, दादर टाटा येथील ब्रिजखाली वाहन उभे करू नये म्हणून तो समजावत होता. त्यावेळी साहिल घाडगे आणि शाहबाज मो. रफिक शेख यांच्याशी त्यांचा शाब्दिक वाद झाला. वाघेला यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सविता देखील होत्या, अचानक दोन्ही आरोपींना वाघेला यांना मारहाण केली आणि पळ काढला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.



खेरवाडी : जुन्या वादाचा घेतला बदला


खेरवाडीत कल्पतरू स्पार्कल्स येथे ही घटना घडली असून, दोन अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात अभिनव चौधरी या इसमाची हत्या झाली आहे. सलग तीन हत्यांमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, काही आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत, मुंबई पोलीस या प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर