- जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार असल्याने सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दरम्यान, भाजपकडे ५ उमेदवार सहज निवडून येण्याइतके संख्याबळ असले तरी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या नेत्यांनी आता विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
या उमेदवारांचा कार्यकाळ संपणार:
- उद्धव ठाकरे
- नीलम गोर्हे
- शशिकांत शिंदे
- अमोल मिटकरी
- गोपीचंद पडळकर
- रणजितसिंह मोहिते-पाटील
- राजेश राठोड
- प्रवीण दटके
- रमेश कराड
दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ असल्याने त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र दुसऱ्या जागेसाठी त्यांना सुमारे १० अतिरिक्त मतांची गरज भासणार असून सध्याच्या परिस्थितीत ते आव्हानात्मक ठरत आहे.
भाजपकडून या नावांची चर्चा :
एकूणच, येणारी विधान परिषद निवडणूक ही केवळ आकड्यांची नव्हे तर प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.






