BMC News : बांधकामांमधील पाणी गटारात, सुकलेल्या चिखलाने भरले गटार

- विकासकांच्या बांधकामांचा भुर्दंड महापालिकेला


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या नालेसफाईच्या अनुषंगाने रस्त्यालगतच्या नाल्यांमधील गाळ काढण्यात येत असून या रस्त्यालगतच्या नाल्यांमधून गाळ,कचरा ऐवजी चक्क चिखल माती मिश्रीत गाळाचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यालगतच्या सर्व पर्जन्य जलवाहिनी या बांधकामांमधील चिखलाने भरुन गेल्या असून हा सुकलेला गाळच सध्या काढण्यात येत आहे. त्यामुळे बांधकामांमधील चिखलमाती मिश्रित पाणी गटारांमध्ये सोडले जात असल्याने त्यातील चिखल सुकून ही गटारे मातीने व्यापून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बांधकामांमधील चिखलमिश्रित मातीचे पाणी सोडण्यात आले नसते तर या पर्जन्य जलवाहिन्यांमधील गाळ काढण्याचीही गरज नव्हती. त्यामुळे बांधकांमामधील चिखलमिश्रित पाण्याचा महापालिकेला भुर्दंड अधिक दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने छोट्या आणि मोठया नाल्यांसह रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी विभाग स्तरावर कंत्राटदार किंवा संस्थांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून गाळाची सफाई केली जात आहे. त्यानुसार सध्या रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, अनेक ठिकाणी वाहून येणारा गाळ काढल्यानंतर ४८ तास सुकल्यानंतर त्या गाळाची विल्हेवाट नेमून दिलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर लावली जाते.



मात्र, या गाळांमध्ये यंदा चिखलमिश्रित मातीचे प्रमाण अधिक दिसून आले असून सुकलेल्या चिकट मातीचे कालेच गाळ म्हणून काढले जात आहेत. गाळ काढणाऱ्या मजूरांच्या म्हणण्यानुसार हा नाल्यातील निव्वळ गाळ नसून बांधकामांचे चिखल माती मिश्रित पाणी सोडले जाते,त्यामुळे नाले गाळाने पूर्ण भरलेले आहेत. आणि ते चिकट मातीनेच भरुन गेलेले आहेत. एकेका पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये पाऊण ते एक फुटापर्यंत या चिकट मातीचे थर जमा झालेले आहेत. त्यामुळे सध्या या मातीचे काले बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे.


मुंबईत अनेक विकासक बांधकामांच्या खोदकामांमधील पाणी हे महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडतात आणि ते चिखल मिश्रित पाणी या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडल्याने ही वाहिनी कोरडी झाल्यानंतर हा चिखल सुकून जातो. परिणामी पर्जन्य जलवाहिन्या या चिखल मिश्रित मातीनेच अधिक भरलेल्या आहेत. त्यामुळे विकासक कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधकामांमधील पाणी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडतात आणि त्यातील चिखलामुळे आपल्या पर्जन्य जलवाहिन्यांत ती माती जमा होवून ती माती बाहेर काढण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.



ऊस तोड कामगार उपसतात गाळ : 


सध्या पेटीका नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सध्या ऊस तोड कामगारांची मदत घेतली जात आहे. लातुर जिल्ह्यातील अनेक गावांमधील ऊस तोड कामगार मोठ्याप्रमाणात मुंबईत दाखल होऊन ते पेटीका नाल्यांमधील गाळ काढत आहेत. या कामगारांना जोडी ८०० रुपये एवढे मानधन दिले जात असल्याची माहिती कामगारांकडून प्राप्त झाली आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर