America Crime : अमेरिका हादरली; कौटुंबिक वादातून हिंसाचार, ८ निष्पाप चिमुकल्यांची हत्या

लुईझियाना : कौटुंबिक वाद आणि लहानग्यांचा निष्पाप बळी, अमेरिकेतील श्रीवपोर्ट येथे झालेल्या या अंदाधुंद गोळीबारात ८ चिमुकल्यानी आपले जीव गमावले आहेत. या प्रकरणाने स्थानिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.



नेमकं घटना काय?


श्रीव्हपोर्ट येथे सकाळी ६ वाजता एका वादातून लहान मुलांवर गोळीबार करण्यात आला. ही मुलं साधारण ६ ते १४ या वयोगटातील असण्याचा अंदाज पोलिसांचा आहे. मुलांव्यतिरिक्त हा गोळीबार आणि २ व्यक्तींवर करण्यात आला आहे. परंतु त्याबाबत सखोल माहिती अजून समोर आलेली नाही. गुन्ह्याचे ठिकाण तीन वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असल्याने तपास आणि चौकशी अधिक गुंतागुंतीची झाली आहे.



लुईझियाना पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की हि अशी घटना असा हिंसाचार हा अत्यंत दुर्मिळ आहे. हे प्रकरण जस दिसत आहे त्याहूनही अधिक मोठे आणि गंभीर आहे. गोळीबारात हत्या झालेल्या मुलांची त्या इसमाची काहीतरी संबंध असल्याची शक्यता आहे, त्यामुळे ही घटना कौटुंबिक वादातूनच घडली असावी हा पोलिसांचा अंदाज आहे.



संशयित झाला ठार


संशयित आरोपीचा पोलीस प्रशासनानाने पाठलाग केला आरोपी आणि पोलिसांमध्ये काही काळ चकमक झाली. यात संशयित ठार झाला आहे.


https://prahaar.in/2026/04/19/eligible-beloved-sisters-will-not-be-deprived-of-the-benefits-eknath-shinde/

पोलिसांनी नागरिकांना आवाहन करत या प्रकरणाशी कोणताही पुरवा, कोणतीही माहिती सापडल्यास, फोटो किंवा व्हिडिओ समोर आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनां-शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या दुर्मिळ हिंसाचारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसर हादरला आहे. पीडितांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे