WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवासात आता स्थानिक सिम कार्ड किंवा महागड्या रोमिंगची झंझट संपणार आहे! व्हॉट्सॲप 'बिल्ट-इन ई-सिम डेटा प्लॅन्स' या नवीन फीचरवर काम करत असून, या माध्यमातून युजर्स थेट ॲपमधूनच डेटा खरेदी करून जगभरात सहज कनेक्ट राहू शकतील.

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲपवर (WhatsApp) तुम्हाला एक भन्नाट फिचर पाहायला मिळू शकते. कारण, त्यावर आता व्हॉट्सॲपच्या सॉफ्टवेअर टीमकडून त्याची टेस्टिंग केली जात आहे. ज्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता वेगवेगळ्या देशांमध्ये गेल्यानंतर तिथले स्थानिक सिम कार्ड खरेदी करण्याची किंवा महागड्या आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज भासणार नाही. युजर्स थेट व्हॉट्सॲपमधूनच आता डेटा खरेदी करू शकतील आणि आपल्या जवळच्या व्यक्तींशी सहज संवाद साधू शकतील.






या आगामी फीचरचे नाव 'बिल्ट- इन ई- सिम डेटा प्लॅन्स' असे नाव असून, व्हॉट्सॲपमधील आगामी बदलांचा मागोवा घेणाऱ्या Wabetainfo या संकेतस्थळाने युजर्सला सविस्तर माहिती दिली आहे. ही सेवा केवळ ई-सिम असणाऱ्या स्मार्टफोन्सवरच उपलब्ध असणार आहे. आजकाल अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोन्समध्ये ई-सिमची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या प्लॅन अंतर्गत मिळणारा डेटा केवळ व्हॉट्सॲप पुरताच मर्यादित राहील की इतर ॲप्ससाठीही वापरता येईल, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हॉट्सॲपचा (WhatsApp) हा ई-सिम डेटा प्लॅन थेट मेसेजिंग ॲपवरूनच विकत घ्यावा लागेल, ज्यामुळे परदेशात गेल्यावरही तुमची मेसेजिंग सेवा सुरळीत सुरू राहील.


दरम्यान, या सुविधेमुळे जगभरातील प्रवासी आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी आणि सहकाऱ्यांशी अखंड संपर्कात राहू शकतील. देश बदलल्यानंतर सुद्धा प्रत्येक वेळी नवीन सिम कार्ड घेणे किंवा महागडा रिचार्ज करणे हा प्रवाशांसाठी मोठा खर्च आणि वेळखाऊ प्रकार ठरतो. या नवीन सुविधेमुळे परदेश प्रवास अधिक सोपा आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्हॉट्सॲपमधील हे 'बिल्ट- इन ई- सिम डेटा प्लॅन्स' फीचर अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.26.47.4 मध्ये दिसून आले आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू असून, ते सर्व युजर्ससाठीच्या स्टेबल आवृत्तीमध्ये कधीपर्यंत उपलब्ध होईल, याबाबत कोणतीही अधिकृत वेळ निश्चित करण्यात आलेली नाही.






युजर्सला व्हॉट्सॲपसाठी ई-सिम प्लॅनचा रिचार्ज खरेदी करणे सोपे व्हावे, यासाठी 1Global या टेक्नोलॉजी कंपनीसोबत भागीदारी करण्याची योजना आखत आहे. 1Global ही ई-सिम तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) सॉल्यूशन प्रोडक्ट आणि रिकॉर्डिंग कम्प्लायन्स बनवण्यासाठी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनी आहे. Wabetainfo ने शेअर केलेल्या माहितीत आणि स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही कोणत्या देशात प्रवास करणार आहात याची निवड करता येते, ज्यामध्ये भारत आणि अमेरिकेसह विविध देशांचा समावेश आहे. ई-सिम हे स्मार्टफोनमधील इनबिल्ट चिपवर कार्य करणारे एक व्हर्च्युअल सिम असते. भारतात रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांसारख्या कंपन्यांकडून ई-सिम सेवा दिली जाते. यावर सामान्य प्रीपेड तसेच पोस्टपेड प्लॅन्स चालतात. कोणत्याही इतरत्र स्मार्टफोनमध्ये ई- सिम कार्यान्वित करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करणे आवश्यक असते.

Comments
Add Comment

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.

AI तंत्रज्ञानावर अमेरिकेचे निर्बंध कडक; एन्व्हिडियाकडून 4 देशांना सर्व्हर पुरवठा रोखला

अमेरिकन चिप निर्माती कंपनी एन्व्हिडियाने मलेशिया, सिंगापूर, थायलंड आणि इंडोनेशियासह आग्नेय आशियातील चार