Nitesh Rane : ‘प्रगती’ अभियानात संयुक्त सागरी व्यवस्थापनाची राज्यात छाप: मंत्री नितेश राणे यांचे कौतुक

मुंबई : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६ अंतर्गत “सर्वोत्तम कल्पना” म्हणून संयुक्त सागरी व्यवस्थापन प्रकल्पाने राज्यात विशेष ठसा उमटवला आहे. अरबी समुद्रात प्रथमच जनसहभागातून मत्स्यसंपदेचे संवर्धन व संरक्षण करण्याचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याची दखल या अभियानात घेतली गेली आहे.





या प्रकल्पांतर्गत किनारपट्टीवरील गावांमध्ये कृत्रिम भित्तिका (Artificial Reefs) उभारण्यात आल्या असून, त्यांची देखभाल करण्यासाठी स्थानिक सहकारी संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. नवोन्मेष, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग यांचा संगम असलेल्या या उपक्रमामुळे राज्यात शाश्वत मत्स्यव्यवसायाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.यामुळे स्थानिक मच्छीमारांना या उपक्रमात सक्रिय सहभाग मिळाला आहे.



माशांच्या प्रजननासाठी सुमारे ५० संरक्षण क्षेत्रे निर्माण करण्यात आली असून, “हक्काचे घर” संकल्पनेद्वारे मत्स्यसंपदेचे नैसर्गिक संवर्धन साधले जात आहे. यासोबतच किमान पकड आकार (MLS) नियमांचे पालन, दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण आणि समुद्रातील प्लास्टिक कचरा संकलन अशा विविध उपक्रमांमुळे सागरी पर्यावरण संतुलन राखण्यास मदत झाली आहे.



या प्रकल्पाचा थेट फायदा पारंपारिक मच्छीमारांना झाला असून, त्यांना मोठ्या प्रमाणात व गुणवत्तापूर्ण मासेमारी मिळू लागली आहे. परिणामी सागरी मत्स्योत्पादनात तब्बल २९ हजार किलोची वाढ नोंदवली गेली आहे, ज्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने