Violent clash at Gurudwara in Germany : जर्मनीतील गुरुद्वारात दोन गटांमध्ये हिंसक झटापट, ११ जण जखमी

जर्मनीतील मोर्स शहरातील ड्यूसबर्ग भागात असलेल्या एका गुरुद्वारात दोन गटांमध्ये अचानक हिंसक झटापट झाली. या घटनेत किमान ११ जण जखमी झाले आहेत. माहितीनुसार, हा वाद इतका वाढला की या वादात चाकू, कृपाण, पेपर स्प्रे आणि अगदी पिस्तुलाचाही वापर करण्यात आला. या भांडणात सुमारे ४० जण सहभागी होते, असे सांगितले जात आहे.


गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच दोन्ही गटांमध्ये वाद वाढला आणि हातघाईतून तो हिंसाचारात बदलला. सोशल मीडियावर काही व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये लोक एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत.


प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही लोकांनी अचानक पेपर स्प्रेचा वापर केला. त्यानंतर एका व्यक्तीने पिस्तुलातून गोळीबार केला, तर अनेकांकडे चाकू आणि कृपाणसारखी धारदार शस्त्रे होती. मात्र, पोलिसांना अद्याप खरे पिस्तूल सापडलेले नाही. प्राथमिक तपासात हे ब्लँक-फायरिंग पिस्तूल असू शकते, असे समोर आले आहे. अशा प्रकारच्या पिस्तुलातून खरी गोळी झाडली जात नाही, मात्र आवाज आणि स्फोटासारखा धक्का निर्माण होतो.



पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा वाद गुरुद्वारा समितीच्या निवडणुका आणि निधी (पैसे) यावरून झाल्याचे समोर आले आहे. जुन्या आणि नव्या व्यवस्थापनामध्ये बऱ्याच काळापासून तणाव होता. गुरुद्वारावरील नियंत्रण आणि निर्णय घेण्याच्या अधिकारावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते.एका मध्यमवयीन प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हा हल्ला आधीपासून नियोजित वाटत होता.


या घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. विशेष टॅक्टिकल युनिटलाही तैनात करण्यात आले. सर्व जखमींवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. दरम्यान, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून नेमका कोणी कोणावर हल्ला केला, याचा तपास पोलिस करत आहेत.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत दुमदुमला “जय महाराष्ट्र”चा निनाद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप’ पुरस्काराने सन्मानित

लंडन : जगभरातील नेत्यांच्या उपस्थितीत ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज “जय

Bangladesh tank blast : बांगलादेशमध्ये युद्धसरावात थरार! टँकमधून फायरिंग करताच अचानक स्फोट; २ जवानांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशमध्ये सैन्याच्या फील्ड फायरिंग सरावादरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे. चटगावमधील हाटहजारी फील्ड

Trump viral post : ‘न्यू मेक्सिको’ आता ‘न्यू अमेरिका’? ट्रम्प यांच्या पोस्टने पुन्हा चर्चेला उधाण

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

Horrific cargo plane crash : मियामी विमानतळावर ॲमेझॉनच्या कार्गो विमानाचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

Horrific cargo plane crash : अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲमेझॉनच्या प्राईम एअर नेटवर्कसाठी (Amazon's Prime Air network) कार्यरत

Kinshasa Accident : कांगोच्या किंशासामध्ये भीषण अग्नितांडव; लग्नाच्या पार्टीत २२ जणांचा मृत्यू

कांगोच्या राजधानी किंशासामध्ये लग्नाच्या पार्टीदरम्यान भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत

Indonesia Volcano Eruption : इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; जकार्तासह अनेक भाग राखेच्या विळख्यात, विमानसेवा तात्पुरती स्थगित

जकार्ता : इंडोनेशियाच्या सुंडा सामुद्रधुनीत स्थित ‘अनाक क्राकाटोआ’ ज्वालामुखीचा रविवारी पहाटे अचानक उद्रेक