Nashik Crime : अश्लील भाषेत बोलायचा ,TCS मध्ये नेटचा पासवर्डही अश्लील भाषेत; पीडितेने सर्वच सांगितलं

नाशिक : नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (TCS) युनिटमध्ये कथित धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाप्रकरणात हादरवणारे खुलासे समोर येत आहे. पीडितांच्या जबाबातून कंपनीत इतके भयानक प्रकार सुरू असताना युनिट हेड आणि व्यवस्थापन काय करत होते असा सवाल करण्यात येत आहे. दरम्यान, 'एसआयटी'ने टीसीएस कंपनीतील गंभीर गुन्ह्याप्रकरणी चौथ्या पीडितेचा जबाब घेतला असून या पीडितेची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी देखील भेट घेतली.

विशिष्ट धर्माचा ग्रंथ हेतुपुरस्कर वाचण्यास सांगणे , गोमांस खाण्यास बळजबरी करणे, महिलांना धमकावणे, अश्लील भाषेचा प्रयोग करणे, कृत्य करणे असे काही संतापजनक प्रकार कंपनीत होत असल्याचे कंपनीतील पीडित कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आता कंपनीतील आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. कंपनीत स्थानिक पातळीवरील नेटचे पासवर्ड देखील अश्लील भाषेत दिले जात होते. यातून अनेकदा धार्मिक भावना देखील दुखावल्या जात होत्या, अशी आपबिती एका पीडितेने सांगितली.

पीडितेने सांगितले की, ती तीन वर्षांपूर्वी (TCS) कंपनीत ट्रेनी कर्मचारी म्हणून लागली होती. तेव्हा रजा मेनन याने तिचा छळ केला, तिच्याशी तो अश्लील भाषेत संभाषण करू लागला. याविषयी तिने ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानी हिच्याकडे तोंडी तक्रार केली मात्र तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले, मात्र यामुळे चिडलेल्या रजा याने अटकेतील आरोपी दानिश, तसेच तौसिफच्या सोबतीने तिचा अधिक छळ सुरू केला. डिजिटल पाठलाग केला, तसेच कंपनीत तिच्याबाबत नको ती अफवा पसरविली असा जबाब पीडितेने दिला आहे.

रजा हा ट्रेनी केबिनमध्ये प्रवेश करून अश्लील बोलायचा. तसेच पदाचा दुरुपयोग करून कामावरून काढून टाकण्याचा दम द्यायचा, असा जबाब फिर्यादीने दिलाय. व्हॉट्सअॅपवर रात्री उशिरा तू काय करतेय, रात्री काय करते वैगेरे नको ते प्रश्न विचारून मानसिक छळ करायचा असा जबाब देखील संबंधित पीडितेने दिला आहे.

टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसेच लैंगिग अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित आरोपी दानिश एजाज शेख याचा अंतरिम जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावत अटकपूर्व जामिनासाठी पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे दानिशचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.दानिशवर धार्मिक भावना दुखावणे तसेच महिलेशी गैरवर्तन केल्याचे आरोप असून, त्याच्यावर दाखल एकूण नऊ गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला असल्याची माहिती सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी दिली.
Comments
Add Comment

Ulhasnagar murder : थरारक! उल्हासनगरमध्ये हरेश गिजवानी यांची गोळी झाडून हत्या; अवघ्या दोन तासांत पोलिसांची धडक कारवाई

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील रेल्वे स्टेशन परिसरात बुधवारी रात्री गोळीबार करून हरेश गिजवानी यांची

Chhatrapati Sambhajinagar : मी सरकारी अधिकारी ! खोटं बोलून लग्न उरकलं ; सत्य समोर येताच नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शासकीय सेवेत अधिकारी असल्याचे खोटे

'निळा ड्रम' मर्डर मिस्ट्रीचा थरारक शेवट! पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि प्रियकराला थेट फाशी, नेमकं काय घडलं होतं?

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाजलेल्या बहुचर्चित आणि थरारक ‘निळा ड्रम’ हत्या प्रकरणात न्यायालयाने अखेर निकाल

नालासोपाऱ्यात खळबळ! नवरात्रोत्सवाच्या वादात आरोपीच्या मोबाईलमध्ये सापडले 150 हून अधिक अश्लील व्हिडिओ; तरुणीची तक्रार दाखल

वसई-विरार : महाराष्ट्रातील नालासोपाऱ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात आणखी एक हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून आयटी कर्मचारी महिलेची आत्महत्या

पुण्यातील ३३ वर्षीय आयटी इंजिनिअर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या

Pune Crime: मालक समजून कर्मचाऱ्याचा खून! पुण्यातील रांजणगावात थरार

पुण्यातील रांजणगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाणीपुरवठा प्रकल्पाचा मालक समजून दुसऱ्याच