WhatsApp New feature : व्हॉट्सॲपवरून आता थेट मोबाइल रिचार्ज; भारतात नवं फीचर लॉन्च

मुंबई : व्हॉट्सॲपने भारतातील युजर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त आणि दैनंदिन वापरात मदत करणारे नवे फीचर लॉन्च केले आहे. आता युजर्सना मोबाइल रिचार्जसाठी वेगळ्या ॲप किंवा वेबसाइटवर जाण्याची गरज उरणार नाही, कारण थेट व्हॉट्सॲपच्या आतूनच प्रीपेड मोबाइल रिचार्ज करता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे व्हाट्सएप्प केवळ चॅटिंगपुरते मर्यादित न राहता एक मल्टी-पर्पज प्लॅटफॉर्म बनत असल्याचे स्पष्ट होत आहे.



या फीचरसाठी व्हॉट्सॲपने PayU या पेमेंट्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे. ही सुविधा सध्या टप्प्याटप्प्याने अँड्रॉइड आणि iOS युजर्ससाठी उपलब्ध होत असून, पुढील काही आठवड्यांत ती सर्व युजर्सपर्यंत पोहोचणार आहे. विशेषतः प्रीपेड कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी ही सुविधा खूपच सोयीची ठरणार आहे.या नव्या अपडेटनंतर युजर्सना व्हॉट्सॲपमध्येच विविध टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स पाहता येतील आणि काही क्लिकमध्येच रिचार्ज पूर्ण करता येईल. Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea (Vi) या प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्सच्या प्रीपेड युजर्सना या फीचरचा फायदा होणार आहे.


पेमेंट्स अधिक सोपे करण्यासाठी व्हॉट्सॲपच्या होम स्क्रीनवर एक “₹” आयकॉन देण्यात आला आहे. हा आयकॉन कॅमेरा आयकॉनच्या शेजारी दिसतो आणि त्यावर क्लिक केल्यावर युजर्स थेट पेमेंट सेक्शनमध्ये पोहोचतात. याच सेक्शनमधून मोबाइल रिचार्जसह UPI द्वारे पैसे पाठवणे, बिल पेमेंट करणे यांसारख्या सुविधा वापरता येतात. काही शहरांमध्ये आधीपासूनच व्हॉट्सॲपवरून मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधाही उपलब्ध आहे.



याशिवाय, “₹” आयकॉन चॅट बॉक्समध्येही उपलब्ध असल्याने युजर्सना चॅट करतानाही सहजपणे पैसे ट्रान्सफर करता येतात. त्यामुळे दैनंदिन व्यवहार अधिक जलद आणि सोपे झाले आहेत.


मोबाइल रिचार्ज करण्याची प्रक्रिया देखील अतिशय सोपी ठेवण्यात आली आहे. युजर्सना “₹” आयकॉनवर क्लिक करून ‘मोबाइल प्रीपेड रिचार्ज’ हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर स्वतःचा किंवा इतरांचा मोबाइल नंबर टाकून टेलिकॉम ऑपरेटर कन्फर्म करायचा आणि उपलब्ध प्लॅन्समधून योग्य प्लॅन निवडायचा. पेमेंटसाठी UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यापैकी कोणताही पर्याय निवडता येतो. UPI वापरणाऱ्या युजर्सना व्यवहार पूर्ण करण्यासाठी UPI PIN टाकावा लागतो. रिचार्ज यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर त्याची संपूर्ण माहिती दिसते आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येही ती सेव्ह होते.


व्हॉट्सॲपने याआधी काही शहरांमध्ये बिल पेमेंट्स आणि मेट्रो तिकीट बुकिंगसारख्या सुविधा सुरू केल्या होत्या. आता मोबाइल रिचार्जचा पर्याय जोडल्यामुळे युजर्ससाठी हा एप्प अधिक व्यापक आणि उपयुक्त बनला आहे. भविष्यात ट्रेन किंवा फ्लाइट तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट्स यांसारख्या आणखी सेवाही व्हॉट्सॲपवर उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एकूणच, या नव्या फीचरमुळे भारतीय युजर्सच्या दैनंदिन जीवनात सोयीची भर पडणार असून, डिजिटल पेमेंट्स अधिक सुलभ करण्याच्या दिशेने व्हॉट्सॲपने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून