TCS Nashik Case : मी देवाचे आभार मानते, टीसीएसमध्ये सहा वर्षे काम करुनही मी जिवंत; महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव

नाशिक : नाशिकच्या टीसीएस या कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण ( Conversion and sexual abuse) या प्रकरणाची सध्या नाशिकच नव्हे संपूर्ण देशात चर्चा आहे. कंपनीत २० ते २५ वर्षे या वयाच्या महिला कर्मचाऱ्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जात असल्याचा आरोप असून इतकी वर्ष कंपनीमध्ये हे काम सुरु होतं तरी कंपनीच्या वरिष्ठांना याबाबत जरादेखील कल्पना नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकरणात ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. ( TCS Nashik Case )


दरम्यान आता या कंपनीत गेल्या सहा वर्षांपासून काम करत असलेल्या महिलेने याप्रकरणी सविस्तर भाष्य केलं आहे. महिलेने जिवंत असल्याबाबत देवाचे आभार मानले आहेत. तसंच ऑफिसमध्ये काय प्रकार चालत होते याबाबत खळबळजनक माहिती उघड केली आहे. संबंधित महिलेने सांगितले की, मी टीसीएसमध्ये काम करत होते, त्यावेळी माझी बदली नाशिकला झाली. त्या ठिकाणी असलेली जी इमारत होती त्या इमारतीच्या गच्चीवर मला एकटीला काम करण्यास सांगण्यात आलं. माझा फोन कायम तपासला जात होता. तसंच मी प्रसाधनगृहात जाण्यासाठी गच्चीवरुन खाली आले किंवा इतर कुठल्याही कारणाने खाली आले तरीही माझी बॅग, मोबाइल आणि इतर वस्तू सुरक्षा रक्षक त्यांच्याकडे घेऊन ठेवत होते. मी पाहात होते की महिला कर्मचाऱ्यांचं पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करुन त्यांचं शोषण केलं जात होतं, त्याचप्रमाणे धर्मांतरणासाठी भाग पाडलं गेलं.


सॉफ्ट टार्गेटवर २० ते २५ वर्षे वयाच्या महिला कर्मचारी


या महिलेने पुढे असंही सांगितलं की साधारण २० ते २५ वर्षे या वयाच्या महिला कर्मचारी या सॉफ्ट टार्गेटवर होत्या. अशा महिलांना किंवा मुलींना धर्मांतरणाच्या जाळ्यात ओढणं सोपं होतं असं ते करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांना वाटत होतं. कंपनीत असं काही होत असेल तर तुम्ही एचआरकडे जाता, पण इथली एचआरही त्यात सामील होती. मी तर देवाचे आभार मानते की सहा वर्षे काम करुनही मी जिवंत आहे असं या महिलेने सांगितलं. या महिलेने एका खासगी वृत्तवाहिनीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. त्यामध्ये ही संपूर्ण माहिती या महिलेने दिली. ( TCS Nashik Case )


नाशिकमधील टीसीएस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम


ती पुढे म्हणाली की, मी टेरेसवर बसत होते, त्यामुळे मी जाळ्यात ओढले गेले नाही. कदाचित मी खाली बसले असते तर माझंही शोषण झालं होतं अशी भीती या महिलेने व्यक्त केली. नाशिकमधला शोषण आणि धर्मांतरणाचा प्रकार समोर आल्यानंतर माझ्या कुटुंबालाही धक्का बसला. आता माझ्या सुरक्षेबाबतही त्यांना काळजी वाटते आहे. दरम्यान मी महिलांना एक व्हा आणि जे काही घडतंय त्या विरोधात आवाज उठवा असंही सांगितलं होतं. जेव्हापासून हे प्रकरण बाहेर आलं आहे तेव्हापासून टीसीएसच्या नाशिकमधल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं गेलं आहे अशीही माहिती या महिलेने दिली.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा