पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना'चा 24 वा हफ्ता वितरित करण्यात आला. 24 वा हफ्ता वितरित करण्यात आल्यानंतर, महाराष्ट्रासह देशभरातली लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'च्या 24 व्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमात आज पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या Video Conference (VC) द्वारे सहभागी झाल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,690 कोटी रुपयांहून अधिक सन्मान निधी वितरित करण्यात आला. सन्मान निधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 91 लाख 12 हजार 765 शेतकऱ्यांना सुमारे 1,835.01 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत ही मदत बळीराजाला मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. यावेळी कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत विकसित 521 युनिट्सचे राष्ट्रार्पण तसेच 12 फलोत्पादन क्लस्टर्सचे उद्घाटनही करण्यात आले.
Jalgaon Accident News : जळगावमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगाव–भुसावळ महामार्गावर नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर मध्यराञी दोन ट्रकची समोरा-समोर भीषण धडक ...
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, आधुनिक कृषी पायाभूत सुविधा आणि फलोत्पादनाला प्रोत्साहन देणारे हे उपक्रम कृषी क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्याबरोबरच विज्ञान- तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन आणि पूरक व्यवसायांना प्राधान्य देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांना 50 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली अथवा त्यांच्या खर्चात बचत झाली आहे. देशातील 85 टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या लहान शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 4 लाख कोटी रुपये थेट बँक खात्यांत देण्यात आले.
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी ...
जागतिक बाजारात खतांच्या किंमती वाढल्यानंतरही केंद्र सरकारने त्याचा भार शेतकर्यांवर पडू दिला नाही. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुमारे 16 लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या 12 वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून 24 लाख कोटी रुपये देण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या 10 वर्षांत शेतकऱ्यांना 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 12 लाख सौरपंप देण्यात आले आहेत. या पंपांमुळे शेतकऱ्यांची 80 कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली आहे. याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीचाही शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
Pune News: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. पुलाच्या कामासाठी करण्यात येत असलेला मातीचा ...
बदलत्या हवामानाशी सुसंगत बियाण्यांच्या सुमारे 3000 नव्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून, राष्ट्रीय गोकुळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक प्रजननाला चालना दिली जात आहे. पशूंना लाळ्या- खुरकुत रोगापासून वाचविण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 150 कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, 8 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्याचा लाभ झाला आहे. देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन 2013-14 मधील पाच लिटरपेक्षा कमी पातळीवरून आता सुमारे आठ लिटरपर्यंत वाढल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.