Israel-Lebanon war : इस्रायल-लेबनॉन युद्ध पुन्हा सुरू; हिजबुल्लाहचा इस्रायली सैनिकांवर ड्रोन हल्ला

पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून इस्रायल संरक्षण दल (Israel Defense Forces) आणि हिजबुल्ला (Hezbollah) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहने एफपीव्ही ड्रोनच्या मदतीने इस्त्रायली सैनिकांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.


हिजबुल्लाहने दावा केला आहे की हा हल्ला इस्त्रायली सैन्याच्या मेडिकल इव्हॅक्युएशन मोहिमेदरम्यान करण्यात आला. हल्ल्यासाठी वापरलेले एफपीव्ही (First Person View) ड्रोन अतिशय वेगवान आणि कमी उंचीवर उडणारे होते, ज्यामुळे ते अचानक लक्ष्यावर झेपावले. मात्र, या हल्ल्यात ड्रोनने आपले मुख्य लक्ष्य अचूकपणे भेदले नाही, अशी माहिती समोर आली आहे.



व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये ड्रोन इस्त्रायली सैनिक आणि हेलिकॉप्टरच्या अत्यंत जवळून जाताना दिसतो. त्या वेळी सैनिक आपल्या जखमी सहकाऱ्यांना हेलिकॉप्टरमध्ये हलवत होते. अचानक ड्रोन आल्याने परिस्थिती गोंधळाची झाली आणि सैनिकांनी तात्काळ गोळीबार सुरू केला. एक ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आला, तर दुसरा ड्रोन हेलिकॉप्टरजवळून जात जमिनीवर कोसळून फुटला.


हिजबुल्लाहने हा हल्ला यशस्वी असल्याचा दावा केला असून त्यांनी संबंधित फुटेजही प्रसिद्ध केले आहे. मात्र इस्त्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार हा हल्ला अयशस्वी ठरला असून कोणतीही मोठी हानी किंवा मृत्यू झालेला नाही.


गेल्या काही महिन्यांत एफपीव्ही ड्रोन हे हिजबुल्लाहच्या युद्धनीतीतील महत्त्वाचे शस्त्र बनले आहे. कमी खर्चिक आणि उच्च अचूकतेमुळे हे ड्रोन रणगाडे, लष्करी वाहने आणि सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी वापरले जात आहेत. युक्रेन-रशिया युद्धानंतर या तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.



दरम्यान, इस्त्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमध्ये आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. दोन्ही बाजूंनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू असून सीमावर्ती भागात सतत तणावाची स्थिती आहे. अनेक वेळा असे हल्ले लक्ष्य चुकवून निष्फळ ठरत असल्याचेही समोर आले आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत युद्धाचा तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त? IAEA प्रमुखांच्या एका विधानामुळे उडाली खळबळ!

आल्बनी: अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक

Somalia Attack: सोमालियात अल-कायदाशी संबंधित अल-शबाबच्या भीषण हल्ल्यात 20 सैनिकांचा मृत्यू, लष्कराच्या दाव्याने खळबळ

मोगादिशू: सोमालियाची राजधानी मोगादिशूमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अल-कायदाशी संबंधित असलेल्या

Spain Train Accident : स्पेनमध्ये रेल्वेचा भीषण अपघात : दोन हाय-स्पीड ट्रेनच्या धडकेत ४६ जणांचा मृत्यू; माद्रिद-अंदालुसिया रेल्वे सेवा ठप्प!

माद्रिद : स्पेनच्या मध्यवर्ती भागात एका अत्यंत भीषण रेल्वे दुर्घटनेत किमान ४६ लोकांचा मृत्यू झाल्याची अतिशय

Cyclone Arnab News : बंगालच्या उपसागरात ''अर्णब'' चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागासाठी प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अर्णब' (Cyclone Arnab) नावाचे चक्रीवादळ आता अधिकच भयानक रूप धारण करत आहे. हवामान

दुबईचा 'गोल्डन रोड'! 'त्या' मार्गाची नेमकी भानगड काय? जाणून घ्या

सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत आणि सामान्य व्यक्तीला ते घेणं परवडत देखील नाही. असं असताना दुबईत मात्र गोल्डन रोड

कॉम्प्युटर प्रिंटलाही लाजवेल असं हस्ताक्षर! नेपाळच्या प्रकृती मल्लाची जगभर चर्चा

आजकालच्या या फास्ट युगात पेनपेक्षा मोबाईल आणि कीबोर्ड जास्त हाताळले जातात. मुलं भराभर टायपिंग करतात, पण जेव्हा