Pune Crime : पुण्यात दहशत कायम; भाजप कार्यकर्त्यावर ९ राऊंड फायर

मावळ : पुण्याची वाढती गुन्हेगारी आता पुणेकरांसाठी धोक्याची घंटा बनत चालली आहे. गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात पुण्यात पसरत चालली आहे, त्यामुळे कायद्याचा धाक कुठे गेला? असे प्रश्न नागिरकांमध्ये पसरले आहेत. एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.




नेमकं काय घडलं?


मावळच्या देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला रमेश रेड्डी असेमृत कार्यकर्त्याचे नाव आहे, अज्ञात लोकांकडून रमेश यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि यात रमेश यांच्यावर ९ राउंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या डोक्यातून आरपार गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री झालेल्या या गोळीबारामुळे नागकरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्या हत्याकांडामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.




पुण्यात नाकाबंदी


रमेश रेड्डी यांच्या अशा जाण्याने नातेवाईक आणि मित्र परिवारात पोकळी निर्माण झाली असून नातेवाईकांनी आक्रोश जाहीर करत काही काळ जुना मुंबई उणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पंचनामा केला जात असून, शहरात नाकाबंदी लागू करण्यात आली आहे.



दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार


पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी शक्ती असल्याचं भासवून एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कौटुंबिक वादामुळे पतीपासून वेगळी राहत होती. तिच्या याच मानसिक परिस्थितीचा आणि असहायतेचा फायदा आरोपी औदुंबर गडदे यानं घेतला.


वाचा सविस्तर : 

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी