Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ कॉलद्वारे भारतीय सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्याची घोषणा केली आहे. भारतीय बँकिंग क्षेत्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून, यामुळे श्रवण किंवा वाचा दोष असलेल्या ग्राहकांना बँकिंगविषयक मदत अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले ISL दुभाषी व्हिडीओ संवादाच्या माध्यमातून ग्राहकांना मदत करतील.


बँक ऑफ बडोदा वेबसाइट, बीओबी वर्ल्ड मोबाइल बँकिंग ॲप, व्हॉट्सॲप बँकिंग, फिजीटल शाखा आणि बँकेचा जेनएआय-सक्षम चॅटबॉट 'एडीआय', या पाच प्रमुख ग्राहक संपर्क केंद्रांवर ही सेवा उपलब्ध आहे. व्हिडीओ कॉल सुविधेची निवड करणारे ग्राहक 'व्हॉइससह व्हिडीओ कॉल' आणि 'सांकेतिक भाषेसह व्हिडीओ कॉल' यापैकी एक पर्याय निवडू शकतात. सांकेतिक भाषेचा पर्याय निवडल्यावर, मदतीसाठी तत्काळ कॉल एका प्रशिक्षित एजंटकडे वळवला जातो.



या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी, श्रवण किंवा वाणीदोष असलेल्या ग्राहकांना प्रभावीपणे सेवा देण्यासाठी बँकेने भारतीय सांकेतिक भाषेतील प्रशिक्षित ग्राहक सेवा प्रतिनिधींची भरती करण्याचा एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे.


या उपक्रमाच्या शुभारंभावर भाष्य करताना, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, "आमच्या संपर्क केंद्राच्या कामकाजात भारतीय सांकेतिक भाषेचा समावेश करून, बँक ऑफ बडोदा सुलभ बँकिंग सेवा पुरवण्यातील एका महत्त्वपूर्ण उणिवेची पूर्तता करते आहे. या उपक्रमामुळे श्रवण किंवा वाचा दोष असलेल्या ग्राहकांना त्यांच्या बँकिंगविषयक गरजा स्वतंत्रपणे, सन्मानाने आणि सहजतेने हाताळणे शक्य होते; तसेच यातून बँकिंग क्षेत्रात एक नवीन आदर्श प्रस्थापित होत आहे. सर्वसमावेशक, तंत्रज्ञान-आधारित आणि ग्राहक-केंद्रित बँकिंगप्रती असलेली आमची वचनबद्धता यातून अधिकच दृढ होते."


सांकेतिक भाषा सहाय्य सेवा सकाळी 09:00 ते सायंकाळी 06:00 या वेळेत उपलब्ध असेल. या सेवेमध्ये सर्व बिगर-वित्तीय बँकिंग सेवा, डिजिटल बँकिंग उत्पादने आणि सेवांबाबतचे सहाय्य, बँकिंगशी संबंधित सामान्य प्रश्न तसेच उत्पादनाविषयीच्या चौकशी व सेवा विनंत्यांसाठीचे सहाय्य यांचा समावेश असेल.



भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेच्या सुरुवातीमुळे बँकिंग सेवांची सुलभता वाढवण्याच्या बँकेच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळाली आहे. यामुळे श्रवण किंवा वाचा दोष असलेले ग्राहक आत्मविश्वासाने आणि कोणत्याही अडथळ्यांविना बँकिंग सेवांशी जोडले जातील.

Comments
Add Comment

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन मुख्य आरोपींना मुंबई न्यायालयाने 31 ऑक्टोबर

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांतील प्रचारतोफा उद्या थंडावणार, २३ ऑक्टोबरला मतदान; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीच्या

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिले ध्वजारोहणाचे अधिकृत आमंत्रण

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे. या सोहळ्याची सुरूवात येत्या 31 ऑक्टोबरपासून होणार आहे. पवित्र

Mumbai Fire News : साकीनाका परिसरात भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Mumbai Fire News: अंधेरी येथील साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे मंगळवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन

Mumbai : पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांसह 4 जणांना अटक; शस्त्र मुंबईत आणल्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या कथित गोळीबार प्रकरणाच्या तपासात दिल्ली