BMC News : झाडांच्या फांद्या छाटणीत पक्ष्यांचे घेतले जातात जीव

- अनेक फांद्यावरील पक्ष्यांची घरटी, पिल्लांना धोका,


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत सध्या मान्सून पूर्व कामांच्या पार्श्वभूमीवर सध्या झाडांच्या धोकादायक फांद्या आणि मृत झाडे कापण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात आहे. परंतु ही छाटणी करताना अनेक पक्ष्यांचे घरटे त्यात उध्वस्त केले जात आहे. त्यामुळे आधीच या सिमेंटच्या जंगलात पक्षी दुर्मिळ होत चालले असून त्यातच झाडांवरील त्यांची घरटी उध्वस्त करून पक्ष्यांच्या प्रजातीच संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा क्रुरपणा असून झाडांच्या फांद्या तोडताना त्यावर चिमणी, कावळे यांच्यासह इतर पक्ष्यांचे घरटे असल्यास त्या फांद्या वाचवून छाटणी केली जावी अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.



मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या नगरसेविका तुलिफ मिरांडा यांनी सध्या मान्सून पूर्व कामांचा भाग म्हणून झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करताना पक्ष्यांची घरटीच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची बाब हरकतीच्या मुद्दयाद्वारे स्थायी समितीच्या सभेत चिंता व्यक्त केली. आज मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात आहे. पण या झाडांच्या फांद्या सरसकट कापल्या जात असून या कापताना कुठेही काळजी घेत नाही. विशेषत: पक्ष्यांची आणि त्यांच्या घरट्यांची. अनेक ठिकाणी फांद्यांची छाटणी केल्यानंतर त्यावरील चिमणी, कावळे, कोकिळा तसेच इतर पक्ष्यांची घरटी जमिनीवर पडून त्यातील पक्ष्यांची अंडी फुटून गेली आहेत. तर काही पिंजऱ्यातून पक्ष्यांची पिल्ले बाहेर पडून ती मृत्यूमुखी पडली आहेत, तर काही पिल्ले जखमी अवस्थेत दिसून येत आहे. यामुळे पक्षी प्रेमी चिंतेत असून किमान या फांद्यांची छाटणी करताना त्यावर पक्ष्यांचे घरटे नाही ना याची खातरजमा करावी आणि असल्यास त्या फांदीची छाटणी करण्यात येवू नये. तसे धोकादायक फांदी असल्यास ते घरटे काढून सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी ठेवले जावेत अशी सूचना मिरांडा यांनी केली. याबाबत योग्य त्या सूचना उद्यान विभागाला देवून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी याची माहिती येईपर्यंत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.



मुंबईतील झाडांच्या फांद्या आणि मृत झाडांची कापणी


मृत झाडे : ३१३


धोकादायक तथा वाकलेली आणि किड लागलेली काढण्यात आलेली झाडे : २९६


रस्त्यालगत असलेली आणि छाटणीयोग्य असलेल्या झाडांची संख्या : ५९,७२०


आतापर्यंत छाटणी झालेल्या झाडांची संख्या : २६,६७२


संपूर्ण वृक्ष छाटणीचे काम ७ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर