Diljit Dosanjh : कॅलगरीतील कॉन्सर्टमध्ये खलिस्तानचे झेंडे दिलजीत दोसांझचा संताप; कार्यक्रम थांबवून दिली कडक प्रतिक्रिया

कॅलगरी : कॅनडातील कॅलगरी येथे गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या ‘ऑरा टूर’ नावाच्या कॉन्सर्टदरम्यान अनपेक्षित तणाव निर्माण झाला. कार्यक्रम सुरू असताना तिथे उपस्थित काही आंदोलकांनी खलिस्तान समर्थक झेंडे फडकवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे वातावरण गंभीर झाले. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे दिलजीतने कार्यक्रम तात्काळ थांबवला.



स्टेजसमोर झेंडे फडकत असल्याचे लक्षात येताच दिलजीतने कोणताही विलंब न करता मंचावरूनच सर्व आंदोलकांना सुनावले. दिलजीतने स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा कार्यक्रम केवळ संगीत आणि मनोरंजनासाठी आहे, राजकीय भूमिका मांडण्यासाठी हा कार्यक्रम नाही.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक झेंडे फडकवताना दिसत आहेत. या घटनेदरम्यान दिलजीत म्हणाला, “दानधर्म करणे हा माझा व्यवसाय नाही, पण मी जिथे जाईन तिथे पंजाबबद्दल नक्की बोलतो.” त्याने पुढे सांगितले की, राष्ट्रीय माध्यमांकडून पंजाबकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना असल्यामुळे त्याने विविध व्यासपीठांवरून राज्याचे मुद्दे मांडले आहेत.



गायकाने यापूर्वीही आपल्या कृतीतून पंजाबप्रती बांधिलकी दाखवली आहे. २०२५ मध्ये 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर मिळालेली रक्कम दिलजीत दोसांझने पूरग्रस्तांसाठी दान केली होती.


याशिवाय, अलीकडेच जिमी फॅलनच्या 'द टुनाइट शो' मध्ये हजेरी लावताना दिलजीतने पंजाब आणि ‘गुरु नानक जहाज’ घटनेचा उल्लेख केला होता. त्यावेळीही दिलजीतने कोणत्याही चित्रपट किंवा गाण्याचे प्रमोशन न करता पंजाबच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "मी जिमी फॅलनच्या शोमध्ये पंजाब आणि गुरु नानक जहाज घटनेबद्दल बोलण्यासाठी गेलो होतो. मी तिथे कोणत्याही चित्रपटाचे किंवा गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी गेलो नव्हतो. मी तिथे पंजाब आणि त्याच्याशी संबंधित समस्या जगाच्या नजरेस आणण्यासाठी गेलो होतो, जेणेकरून राष्ट्रीय माध्यमेही त्याकडे लक्ष देतील. मी टेलिव्हिजनवर कोणासमोर बसलो होतो या गोष्टीचा तुम्हाला अद्याप त्रास होत असेल... तर तुम्हाला हवे तितके झेंडे दाखवत राहा."

Comments
Add Comment

Eatha : 'मेरा भरोसा ही मेरा घमंड था रे'...अंगावर शहारे आणणारा 'ईठा'चा ट्रेलर रिलीज

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या

Ibrahim Ali Khan : पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांचा ब्रेकअप? तीन वर्षांच्या नात्यानंतर विभक्त झाल्याची चर्चा

Ibrahim Ali Khan : बॉलिवूडमध्ये काही कलाकारांच्या नात्यांची चर्चा त्यांच्या अधिकृत कबुलीशिवायच रंगते. अभिनेत्री पलक

अंधारात हरवलेल्या साई पल्लवीला कुत्र्याच्या पिल्लाने दाखवला मार्ग; अनुभव ऐकून व्हाल थक्क!

नमित मल्होत्रा यांच्या 'रामायण' चित्रपटातील सीतेची भूमिका साकरणारी अभिनेत्री साई पल्लवी अलीकडेच एका टॉक

Ashwini Gorle : पैठणी फ्युजन गाऊनवरून ट्रोलिंग; अश्विनी गोरलेने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली...

Ashwini Gorle: सोशल मीडियावर कलाकारांच्या लूकची चर्चा होणे नवीन नाही. मात्र, एखाद्या पोशाखावरून संस्कृतीचा अपमान

घटस्फोटानंतरही ऋतिक रोशनचे सुजैनवर खास प्रेम ! एक्स-वाइफला म्हटले 'बेस्ट मॉम'; सबा आझादची प्रतिक्रियाही चर्चेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची माजी पत्नी सुजैन यांच्यात घटस्फोटानंतरही चांगले संबंध असल्याचे

बिग बॉसच्या घरात रंगला नॉमिनेशनवरून वाद; स्काउटने लव्हला केलं नॉमिनेट, लव्ह गिल भावूक

बिग बॉसच्या सीजन 20 मध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. टास्कदरम्यान होणारी भांडणं, मैत्री यामुळे हा सीजन अधिक