Women's T20 World Cup : मुंबई महिला लीगचे पहिल्यांदाच आयोजन; इरा जाधव सर्वात महागडी क्रिकेटपटू

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामादरम्यान टी२० मुंबई लीगचा लिलाव पार पडला. पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच, फ्रँचायझींनी महिला क्रिकेटपटूंचीही निवड केली. टी२० मुंबई लीगच्या लिलावात, १६ वर्षीय क्रिकेटपटू इरा जाधवने सर्वांना आश्चर्यचकित केले. ती लीगची सर्वात महागडी महिला क्रिकेटपटू ठरली. आकाश टायगर्सने तिला १० लाख रुपयांना विकत घेतले. सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या इराची मूळ किंमत १ लाख रुपये होती. परिणामी, तिच्यासाठी १० पट जास्त बोली लागली.


इरा १९ वर्षांखालील फलंदाजी गटाचा भाग होती. गेल्या वर्षी त्रिशतक झळकावून तिने इतिहास रचला होता. १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारी ती पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. जानेवारी २०२५ मध्ये, वयाच्या १४ व्या वर्षी मुंबईकडून खेळताना, तिने १५७ चेंडूंमध्ये नाबाद ३४६ धावा केल्या. या खेळीत ४२ चौकार आणि १६ षटकारांचा समावेश होता. यामुळे फ्रँचायझींमध्ये तिच्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.



लिलावानंतर इरा म्हणाली, "एवढ्या मोठ्या रकमेची मला कधीच अपेक्षा नव्हती. हे एक सुखद आश्चर्य होतं. मी पैशांचा विचारही करत नव्हते. मला फक्त टी२० मुंबई लीगमध्ये खेळायचं होतं, कारण त्यामुळे मला चांगला अनुभव मिळणार होता."


टी२० मुंबई महिला लीग पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे. यासाठी तीन क्रिकेटपटूंना आयकॉन क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले आहे. सोबो मुंबई फाल्कन्सकडून सायली सातघरे, ठाणे स्काय रायझर्सकडून सायमा ठाकोर आणि आकाश टायगर्सकडून हुमैरा काझी. महिला लीगच्या लिलावात एकूण ३६३ खेळाडूंनी भाग घेतला होता. यापैकी ५० क्रिकेटपटूंची संघांनी एकूण १.४७ कोटी रुपये खर्च करून निवड केली. आकाश टायगर्सने गेल्या वर्षी १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची उपकर्णधार सानिका चाळकेची ५.५० लाख रुपयांना निवड केली. ठाणे संघाने वृषाली भगत हिला ६ लाखात, खुशी भाटिया हिला ४.५० लाखात आणि जिल डी’मेलो हिला ४.५० लाखात विकत घेतले. सोबो मुंबई फाल्कन्सने सिमरन शेखला 7 लाखांना, हर्ले गालाला 5 लाखांना आणि रिया चौधरीला 5.50 लाखांना विकत घेतले.



T20 मुंबई महिला लीग संघ


सोबो मुंबई फाल्कन्स - सायली सातघरे, सिमरन शेख, हर्ले गाला, रिया चौधरी, अक्षया शिंदे, मेगन रॉड्रिग्स, जान्हवी काटे, वेदिका निकम, सन्मय उपाध्याय, सौम्या तमांग, आरोही बांबोडे, याशिका रावत, रेश्मा नायक, स्वरध्वज, स्वरध्वनी सारिका कोळी, वंशिका कोठाकर


ठाणे स्काय रायझर्स - सायमा ठाकोर, वृषाली भगत, खुशी भाटिया, झील डिमेलो, मानसी पाटील, अश्विनी निषाद, सौम्या सिंग, कशिश निर्मल, प्रकाशिका नाईक,त्रिशा परमार, किंजल कुमारी, निव्या आंब्रे, शौर्य कदम, हिया पंडित, दिया चलवड, मेहक पोकर,


आकाश टायगर्स - हुमैरा काझी, इरा जाधव, सानिका चाळके, फातिमा जाफर, जिया मंद्रवाडकर, सिद्धी पवार, मनाली दक्षिणी, सिद्धी कामठे, जागरुवी पवार, रितिका यादव, किमाया राणे, बतुल परेरा, मिताली म्हात्रे, मुल्ला अलिना फरीद, समृद्धी रावूल, गार्गी वारंग.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने