'थर्मास'च्या लाखो बॉटल्स आणि जारमध्ये गंभीर दोष, कोणाची दृष्टी गेली तर कोणाला... कारण काय ?

Thermos Bottles Important information : तुम्ही देखील 'थर्मास' (Thermos) ब्रँडचा फूड जार किंवा पाणी बॉटल वापरात असाल तर ही महत्त्वाची माहिती तुम्हांला असणं आवश्यक आहे. अमेरिकेच्या ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाने (US Consumer Product Safety Commission) याबाबत सूचना केली आहे. आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार, कंपनीने आपल्या लोकप्रिय उत्पादनांमध्ये सुरक्षिततेचा गंभीर दोष आढळल्याने 82 लाख युनिट्स बाजारातून परत मागवले आहेत. नेमकं यामागचं कारण काय ? हे जाणून घ्या.


82 लाख युनिट्स बाजारातून परत मागवण्याचे कारण


या उत्पादनांच्या 'स्टॉपर' म्हणजेच झाकणाच्या यंत्रणेत मोठी त्रुटी आढळली आहे. गरम पदार्थ साठवल्यावर कंटेनरमध्ये दाब कमी करण्याची यंत्रणा नसल्याने आत प्रचंड प्रेशर तयार होते. जेव्हा ग्राहक हे जार उघडतात, तेव्हा हे झाकण अगदी वेगाने बाहेर उडून ग्राहकाला धडकते. अशा प्रकारच्या घटनांच्या आतापर्यंत 27 तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत, तर धक्कादायक म्हणजे 3 जणांना आपली दृष्टी कायमची गमवावी लागली आहे.


माध्यमांतील वृत्तांनुसार, ही परत मागवण्याची प्रक्रिया विशेषतः जुलै 2023 पूर्वी उत्पादित केलेल्या स्टेनलेस किंग फूड जार्स (मॉडेल SK3000 आणि SK3020) तसेच सर्व स्पोर्ट्समन फूड अँड बेव्हरेज बॉटल्स (मॉडेल SK3010) वर लागू होते. या वस्तू विविध रंगांमध्ये विकल्या गेल्या होत्या आणि त्यांच्या बाहेरील बाजूस ब्रँडचे नाव छापलेले असते, तर मॉडेलचा तपशील सामान्यतः तळाशी नमूद केलेला असतो. त्यामुळे ते ओळखणे सोपे होते. (Thermos Bottles Important information)


ग्राहकांसाठी महत्वाची सूचना (Important notice for customers)


तुमच्याकडे असलेल्या थर्मासच्या तळाशी असलेला मॉडेल नंबर तपासा.


जर तुमचे उत्पादन वरील यादीत असेल, तर त्याचा वापर त्वरीत थांबवा.


कंपनी अशा ग्राहकांना नवीन सुरक्षित स्टॉपर किंवा संपूर्ण उत्पादन बदलून देणार आहे.


अधिक माहितीसाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला (support.thermos.com) भेट द्या.

Comments
Add Comment

Nepal Flood : मृत्यूवर मात! नेपाळमधील महापुरातून १० दिवसांनी परदेशी नागरिकासह दोघांना सुरक्षित बाहेर काढले

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण महापुरानंतर १० दिवसांनी एक अत्यंत दिलासादायक बातमी

Nepal Floods News : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १३०० हून अधिक बळी; बचावकार्यासाठी सैन्याकडून ताडी नदीवर 'रोप ब्रिज'ची उभारणी

नुवाकोट : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूर आणि ढगफुटीमुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत

Indian entrepreneurs in USA : अमेरिकेत भारतीय उद्योजक अमेरिकन तरुणांना देणार प्रशिक्षण; ‘फाउंड्री स्कूल’चा शुभारंभ

वॉशिंग्टन : अमेरिकेने देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘फाउंड्री स्कूल’ या नव्या प्रशिक्षण

Mohan Bhagwat Britain Visit : सरसंघचालकांच्या ब्रिटन दौऱ्यात ‘लोकसंवादा’वर भर

लंडन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 2 ते 7 सप्टेंबरदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. संघाचे

Nepal Car Accident : नेपाळमध्ये फेवा तलावात कार कोसळून अपघात; दोन भारतीयांचा मृत्यू, दोघे जखमी

पोखरा : नेपाळमधील पोखरा येथे शुक्रवारी पहाटे एक कार फेवा तलावात कोसळल्याने अपघात घडला. या अपघातात दोन भारतीय

Giorgia Meloni : मेलोनी ठरल्या युद्धोत्तर इटलीतील सर्वाधिक काळ पंतप्रधान; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

इटली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देशाच्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासात सलग सर्वाधिक काळ