Pune-Lonavala Railway Block : पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा विशेष ब्लॉक; जाणून घ्या कोणत्या गाड्या राहणार बंद

पुणे : पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजेच सोमवार ४ आणि मंगळावर ५ मे रोजी काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे दैनंदिन प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तळेगाव रेल्वे स्थानकावर पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष दुरुस्ती ब्लॉक घेतला जात असल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.



भविष्यातील अपघात टाळण्यासाठी दोन दिवसांचा विशेष ब्लॉक :


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्थानकावर ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) दुरुस्ती, वायरिंग तपासणी तसेच क्रॉसओव्हर सुधारणा अशी महत्त्वाची कामे सुरू आहेत. ही कामे रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक मानली जात असून, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणि वेगवान सेवा देण्यासाठी ती केली जात आहेत. यासाठी दररोज दुपारी १:०५ ते ३:०५ या वेळेत दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.



एकूण सहा लोकल गाड्या रद्द :


या ब्लॉकदरम्यान रेल्वे वाहतूक मर्यादित राहणार असल्याने ४ मे रोजी शिवाजीनगर-तळेगाव आणि पुणे-तळेगाव-पुणे मार्गावरील एकूण सहा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ५ मे रोजी याच वेळेत चार लोकल सेवा रद्द राहणार आहेत. याशिवाय काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.



रेल्वे प्रशासनाकडून खाजगी वाहतुकीच्या वापराचा सल्ला :


दररोज कामासाठी पुणे आणि लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांवर या बदलांचा थेट परिणाम होणार आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्यांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी प्रवासाची योजना आखण्याचा सल्ला दिला असून, पीएमपीएमएल बस सेवा किंवा इतर खाजगी वाहतूक पर्यायांचा विचार करण्यास सांगितले आहे.



प्रवाशांनी शिस्त पाळून सहकार्य करावे :


तसेच, स्थानकांवर गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता अतिरिक्त रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. प्रवाशांनी शिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.


ही दुरुस्ती कामे पूर्ण झाल्यानंतर पुणे-लोणावळा मार्गावरील रेल्वे सेवा अधिक सुरळीत, जलद आणि सुरक्षित होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. भविष्यात गाड्यांचा वेळ पाळण्याचे प्रमाण सुधारेल आणि तांत्रिक अडचणी कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



दरम्यान, प्रवाशांनी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा स्थानकांवरील चौकशी काउंटरवरून अद्ययावत वेळापत्रक तपासावे. अचानक होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन आधीच करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या दोन दिवसांत संयम राखून रेल्वेला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला बारा वर्षे पूर्ण; राजकारणातील एक तप आणि विकासाचा नवा अध्याय!

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक शपथविधीला ३१ ऑक्टोबर,

Cm Devendra Fadanvis News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! चारा परराज्यात पाठविण्यास बंदी...

मुंबई: राज्यातील चारा परराज्यात पाठवण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून, चाऱ्याचा वापर बायोफ्युएल किंवा

Pankaja Munde : चारा टंचाईवर मात करण्यासाठी 5 टक्के निधीची तरतूद, राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर

मुंबई: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित

मुंबई: दुष्काळजन्य परिस्थितीतील संभाव्य चारा टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने

PM Kisan Samman Nidhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या 24 व्या हप्त्याचे वितरण; महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना'चा 24 वा हफ्ता वितरित

Indapur News : इंदापूरमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एक कामगार ठार, एक गंभीर

Pune News: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली.