BMC News : महापालिकेत सत्ताधाऱ्यांची इज्जत थोडक्यात वाचली, शिंदे धावून आले आणि विरोधकांना.....

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिका सभागृहात तातडीचा प्रस्ताव घेण्यावरून विरोधात मतदान झाल्यामुळे सत्ताधारी पक्षाला प्राधान्य क्रम घेता आला नाही. सत्ताधारी पक्षावर आलेल्या या नामुष्कीनंतर पुन्हा एकदा महापालिका सभागृहात सत्ताधारी पक्षाची जाता जाता लाज वाचली गेली. महापालिका सभागृहात गणसंख्या पूर्ण झाल्यामुळे सभागृहात महापौर उपस्थित न राहिल्यामुळे विरोधी पक्षाने आपला पिठासीन अधिकारी नेमण्याच्या मागणी करत या खुर्चीवर आपला हक्क दाखवण्याची तयारीही सुरु केली होती. पण त्याच वेळेला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे एकमेव सदस्य तिथे आले आणि विरोधी पक्षनेत्यांकडून होत असलेला प्रयत्न चुकीचा असून प्रथा अणि परंपरेला धरुन नसल्याचे सांगत त्यांना परतवून लावले. त्यामुळे भाजपची पुन्हा एकदा लाज वाचली गेली आहे.



मुंबई महापालिकेची मे महिन्याची सभा सोमवारी दुपारी २ वाजता बोलावण्यात आली होती. या सभेला पावणे तीन वाजेपर्यंत सुरुवात न झाल्यामुळे उबाठा, काँग्रेस, मनसे आणि एमआयएमच्या नगरसेवकांची गणसंख्या अधिक असल्याने आणि सत्ताधारी भाजपचे सदस्य सभागृहात नसल्याचे लक्षात घेवून पिठासीन अधिकारी म्हणून माजी महापौरांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला. याला शैलेश फणसे यांचे अनुमोदन असल्याचे सांगत गणसंख्या पूर्ण असल्याने पिठासीन अधिकारी म्हणून माजी महापौरांची नेमणूक करण्याची मागणी लावून धरली.



पण त्यावर सभागृहात उपस्थित असलेले सर्व नगरसेवक तातडीन सभागृहात बाहेर गेले. पण त्यानंतरही भाजपचे सदस्य सभागृहात आले नाही. परिणामी विरोधी पक्षाने गणसंख्या आहे की नाही यासाठी नगरसेवकांची संख्या मोजली जावी अशी विनंती केली, त्यावर सचिव विभागाच्या अधिकाऱ्यांनी नगसेवकांची मोजणी केली, यावेळी विरोधकांची गणसंख्या पुरेशी असल्याचे दिसून आले. त्यामुळे माजी महापौरांना या पिठासीन अधिकाऱ्याची निवड करण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च महापौरांच्या खुर्चीवर अर्थात पिठासीन अधिकारी म्हणून बसण्याचा प्रयत्न करु लागल्या. परंतु याबाबतचा प्रस्ताव सचिवांनी न पुकारल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला प्रस्तावच स्वीकारला गेला नव्हता आणि माजी महापौर म्हणून विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, किंवा उपमहापौर हेमांगी वरळीकर यांना पिठासीन अधिकारी म्हणून न पाठवता किशोरी पेडणेकर या स्वत:च तिथे बसवण्यास गेल्या. विशेष म्हणजे किशोरी पेडणेकर या माजी महापौर असल्या तरी विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यामुळे त्या पिठासीन अधिकारी म्हणून तिथे बसण्यास गेल्या हे नियमाला धरुन नव्हत्या, आणि त्यातच त्यांनी महापौरांच्या खुर्चीवर जावून बसण्याची खटाटोप करत होत्या, त्यावर सचिवांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे तिथे धावत तिथे आले आणि असला प्रकार योग्य नाही असे सांगत आपण विरोधी पक्षनेत्या आहात. त्यामुळे असे कृत्य करू नका, अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल,असे सांगण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर किशोरी पेडणेकर या मागे निघून जात आपल्या जागेवर जावून बसल्या. सभा शास्त्रानुसार गणसंख्या पूर्ण झाली असेल तर विरोधक पिठासीन अधिकारी म्हणून माजी महापौरांनी बसवण्याची मागणी करू शकतात, परंतु विरोधी पक्षाकडून चुकीच्या पध्दतीने विरोधी पक्षनेत्याच तिथे जावून बसवण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा धोका टळला गेला. त्यामुळे या प्रकाराकडे महापौर आणि सभागृहनेत्यांचे लक्ष नव्हते ही सर्वांत दुर्देवी बाब असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर