Mother and daughter Sucide : नागपुरात आई आणि मुलीची आत्महत्या; जमिनीसाठी पतीने केला अमानुष छळ

नागपूर: नागपुरातील व्यंकटेशनगरमध्ये घडलेल्या माय-लेकीच्या आत्महत्येच्या प्रकरणामागील धक्कादायक कारण अखेर समोर आले आहे. जमिनीच्या वादातून पती आणि सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून दोघींनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती तपास केल्यानंतर समोर आली आहे.



नागपुरातील व्यंकटेशनगर परिसरात आई आणि मुलीने एकाच वेळी गळफास लाऊन आत्महत्या केली होती, या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणाचा तपास करताना नंदनवन पोलिसांना गंभीर आणि संतापजनक माहिती मिळाली आहे. पत्नी आणि तिच्या आईच्या नावावर असलेली संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पती लोकेश ब्रह्मे आणि त्याच्या कुटुंबीयांनी सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्यामुळेच या दोघींनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.


पैशांसाठी छळ, बाळाच्या मृत्यूनंतर वाढला त्रास


१ मे २०२६ रोजी संगीता श्रीराम ढबाले (वय ५२) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रह्मे (वय २९) यांनी आत्महत्या केली होती. तपासादरम्यान समोर आले की, आकांक्षाच्या लग्नानंतर तिचा पती लोकेश, सासू अनसूया, सासरा सुधाकर, नणंद प्राची आणि तिचा पती अमोल डफ यांनी तिचा छळ सुरू केला होता, माहेरून पैसे आणण्यासाठी हा छळ सुरू होता. दोन महिन्यांपूर्वी आकांक्षाला मुलगी झाली होती, मात्र जन्मानंतर लगेचच त्या बाळाचा मृत्यू झाला. या दु:खद घटनेनंतर सासरच्या मंडळींनी तिच्यावरचा छळ आणखी तीव्र केला.



जमिनीवर डोळा, अत्याचाराची परिसीमा


या छळाची परिसीमा तेव्हा गाठली गेली, जेव्हा आरोपींनी आकांक्षा आणि तिची आई संगीता यांच्या नावावर असलेली जमीन लोकेशच्या नावावर करण्यासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. या मागणीसाठी आकांक्षाला वारंवार मारहाण करण्यात येत होती आणि तिला अत्यंत क्रूर वागणूक दिली जात होती. या अखंड त्रासाला कंटाळून आकांक्षा आपल्या आईकडे व्यंकटेशनगर येथे आली आणि शेवटी माय-लेकीने एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केली व आपले जीवन संपवले.


या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी आकांक्षाचे मामा विलास केशवराव पिसे यांच्या तक्रारीवरून पती लोकेश ब्रह्मे याच्यासह सासरच्या पाच जणांविरुद्ध हुंडाबळी आणि छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने