Nasrapur : नसरापूर घटनेतील पीडित चिमुकलीचा मृत्यू ॲस्फिस्कियामुळे; ॲस्फिस्किया म्हणजे नेमकं काय ?

पुणे : राज्याला हादरवणाऱ्या पुणे येथील नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पीडित मुलीचा मृत्यू हा ॲस्फिस्कियामुळे (Asphyxia) झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. ससून रुग्णालयाने हा अहवाल पोलिसांकडे सोपवला आहे. तर याप्रकरणी तीन सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत सरकारी वकिलांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. (Pune Nasrapur Case)


ॲस्फिस्किया म्हणजे काय?


ॲस्फिस्किया म्हणजे श्वास कोंडणं, याच कारणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ॲस्फिस्किया (Asphyxia) म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद होऊन श्वास घेण्याची प्रक्रिया बिघडणं. यामुळे मेंदू, इतर अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण होतो. श्वासात अडथळा आल्याने किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने शरीरात ऑक्सिजनची तीव्र कमतरता निर्माण होऊन अनेकदा बेशुद्धी येते किंवा मृत्यू ओढावतो. (Pune Nasrapur Case)


दरम्यान, या प्रकरणात आरोपीने याआधी गुन्हा केल्याचं माहीत असूनही पोलिसांनी ही माहिती न्यायालयात न दिल्याने या घटनेची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमून करावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने सहा अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं आहे. (Pune Nasrapur Case)


7 मे पर्यंत पोलीस कोठडी


पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी 1 मे रोजी उघडकीस आली. या प्रकरणात ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.