Vivek Agnihotri's first reaction after Mamata Banerjee's defeat : ‘आता भीतीशिवाय जगा’; ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर दिगदर्शक विवेक अग्निहोत्रींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सर्वत्र भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा आणि ममता बॅनर्जींच्या पराभवाचा जल्लोष साजरा होत आहे. याच जल्लोषात आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री देखील मागे नाहीत. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देत विवेक अग्निहोत्री यांनी "आता भीतीशिवाय जगा" असं म्हंटल आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.


नेमकं काय म्हणाले विवेक अग्निहोत्री ?


इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं की, “पुन्हा कधीच नाही. अनेकांना माहिती नाही, पण 'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर मला बंगालमध्ये अडवण्यात आलं. माझा चित्रपट सिनेमागृहांतून काढून टाकण्यात आला आणि मला राज्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.







ते पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षी 'द बंगाल फाइल्स'ला देखील पश्चिम बंगालमध्ये अनेक अडथळे आले. आमचा ट्रेलर लॉन्च होऊ दिला गेला नाही. आमच्यावर हल्ले झाले, मारहाण करण्यात आली. माझ्याविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आणि माझ्यावर राज्यात बहिष्कार टाकण्यात आला. इतकंच नव्हे, तर मला राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठीही जाता आलं नाही,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.


या सगळ्या घटनांचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्री यांनी “सिर उठाकर चलो...” असं म्हणत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, निवडणुकीपूर्वी त्यांनी 'द बंगाल फाइल्स'अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. “आम्ही कधीच हार मानली नाही. गुप्तपणे हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवला. आमचा लढा सुरूच ठेवला आणि अखेर हा अभूतपूर्व विजय मिळाला. बंगालच्या जनतेचं अभिनंदन. आता तुम्ही भीतीशिवाय जगू शकता,” असंही त्यांनी म्हटलं.



दरम्यान, 'द बंगाल फाइल्स' या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये अधिकृत बंदी घालण्यात आलेली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, अनेक सिनेमागृह मालकांनी परस्पर सहमतीने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागील कारणांबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती.


'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि आयएम बुद्धा प्रोडक्शन्स यांच्या निर्मितीत तयार झाला आहे. १९४०च्या दशकातील बंगालमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, विशेषतः 'कलकत्ता हत्याकांडा'च्या दरम्यान झालेल्या हिंसाचारावर हा सिनेमा आधारित आहे. त्या काळातील अस्थिरता, विचारसरणीतील संघर्ष आणि अस्तित्वासाठीची झुंज यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’