Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी



२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश चंद्रशेखर याने अभिनेत्री नोरा फतेहीला लिहिलेले एक हस्तलिखित पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्रामुळे बॉलिवूड वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सुकेशने नोरावर गंभीर दावे आणि अप्रत्यक्ष धमक्या दिल्या आहेत.



महागड्या भेटवस्तू आणि पैशांच्या व्यवहारांचा दावा


या पत्रात सुकेशने दावा केला आहे की, मोरोक्कोमधील कासाब्लांका येथे घर खरेदी करण्यासाठी त्याने नोराला कोट्यवधी रुपये दिले होते. तसेच महागड्या बर्किन बॅग, बीएमडब्ल्यू आणि 'रेंज रोव्हर' यांसारख्या लक्झरी गाड्यांबद्दल नोराशी झालेल्या व्हॉट्सॲप संभाषणांचा उल्लेख करत, नोराला त्याच्या प्रभावाची पूर्ण जाणीव होती, असे त्याने म्हटले आहे.



जॅकलिनबद्दल हेवा वाटत असल्याचा आरोप


सुकेशने आपल्या पत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतच्या संबंधांवरही भाष्य केले आहे. नोराची जॅकलिनसोबतच्या त्याच्या नात्यावर पोटदुखी होती, असा दावा करत सुकेशने लिहिले, "तू मला दिवसातून १०-१० वेळा फोन करून जॅकलिनला सोडायला सांगायचीस आणि तुझ्या जीवनशैलीचा संपूर्ण खर्च उचलण्यासाठी मला प्रवृत्त करायचीस."



"मला चिथावणी देऊ नकोस" - सुकेशचा इशारा


पत्राच्या शेवटी सुकेशने नोराला थेट इशारा दिला असून, "मला चिथावणी देऊ नकोस," असे म्हटले आहे. आपल्या जवळील उरलेले सर्व पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी त्याने दिली असून, जर पुरावे बाहेर आले तर कितीही पीआर (PR) केला तरी नोराची प्रतिष्ठा वाचू शकणार नाही, असा दावा त्याने केला आहे.


दरम्यान, या प्रकरणात नोरा फतेहीने यापूर्वीच सर्व आरोप फेटाळून लावत आपण या संपूर्ण प्रकरणात पीडित असल्याचा दावा केला आहे. या नव्या पत्रामुळे या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.




Comments
Add Comment

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ