Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा अक्षरशः 40 अंशाच्या पुढे गेल्याने अनेक जिल्हे होरपळले आहेत. अशातच आज राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलीय.



या जिल्ह्यांत पावसाची हजेरी


सातारा (Satara) - जिल्ह्यातील पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे, बोरगाव, नागठाणे, शहरातील उपनगरात पाऊस झाला आहे.. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची चांगलीच उडाली तारांबळ उडाली. आज अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे. (Maharashtra Rain Update )


सिंधुदुर्ग (Sindhudurg) - जिल्ह्यातील वैभववाडी, फोंडा, करुळ सह कणकवली, वैभववाडी तालुक्याच्या भागात अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसासाठी यलो अलर्ट पावसाचा जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा वेग आहे. (Maharashtra Rain Update )


रायगड (Raigad )- रायगडच्या दक्षिण भागातही मुसळधार अवकाळी पाऊस झाला. महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात मुसळधार पावसाची बरसात सुरु आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वांगणे आणि परिसराला झोडपून काढलं आहे. (Maharashtra Rain Update )



नांदेड (Nanded ) - नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूर तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलं. आजच्या या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः या भागात उन्हाळी तीळ अन भुईमुंग पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते, या दोन्ही पिकांसह हळदीला देखील या पावसाचा फटका बसलाय.आजच्या पावसाने माहूर सह शेजारच्या किनवट तालुक्यात दाणादाण उडवली आहे.


या अचानक आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. तर आज अनेक आयोजित लग्नसोहळ्याला या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसाने वऱ्हाडी मंडळींचे मोठे हाल झाले. नांदेड मध्ये अचानक आलेल्या वावटळीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला. हवेत प्रचंड प्रमाणात धुळीचे कण पसरल्यामुळे शहरात काहीकाळ दृश्यमानता कमी झाली होती. अचानक आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली तर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.