'Deool Band-2' Movie : शिर्डीत प्रवीण तरडेंचा मोठा निर्णय! ‘देऊळ बंद २’ची कमाई शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी

शिर्डी:  बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद - २’ (Deool Band-2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यंदा चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. “आता परीक्षा देवाची” अशी दमदार टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात एका महिला शेतकऱ्याची कथा मांडण्यात आली आहे. ही महिला थेट स्वामींचीच परीक्षा घेताना दिसणार असून, चित्रपटातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर विषयावर भाष्य करण्यात आले आहे. आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या काळानुसार शेतीत बदल आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे, असा ठाम संदेश या चित्रपटातून देण्यात येणार आहे. हमीभाव, बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, कृषी सेवा केंद्रांची परिस्थिती अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवरही चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.



शेतकऱ्यांच्या व्यथा, संघर्ष आणि त्यांच्या आयुष्यातील वास्तव मांडणाऱ्या ‘देऊळ बंद - २’ चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच शिर्डीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह संपूर्ण कलाकारांनी साईंच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साई संस्थान प्रशासनाकडून टीमचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी प्रवीण तरडे यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सर्वांच्याच मनात त्यांच्या विषयीचा आदर अधिक वाढला. ‘देऊळ बंद - २’ या चित्रपटातून होणारी कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी शिर्डीत केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा आणि बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत नवे पर्याय स्वीकारण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण तरडे म्हणाले, “सरकार बदलत जातात, पण शेतकऱ्यांचे प्रश्न कायम राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. आत्महत्या करून काहीही साध्य होत नाही. काळानुसार शेतीची पद्धत बदलली पाहिजे. ‘देऊळ बंद - २’ हा सिनेमा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. या चित्रपटाची कमाईही आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार आहोत.”


दरम्यान, ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता तब्बल काही वर्षांनंतर ‘देऊळ बंद - २’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, हा चित्रपट २१ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार