Maharashtra Assembly’s Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या १७ जागा भरणार?

निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग; स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची अट पूर्ण झाल्याने मार्ग मोकळा


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी या निवडणुका पार पडल्यास वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.



राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे अनेक मतदारसंघांतील विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. नियमानुसार, संबंधित मतदारसंघात किमान ७५ टक्के मतदार (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य इ.) उपलब्ध असणे आवश्यक असते. आता निवडणुका पार पडल्याने ही कायदेशीर अट पूर्ण झाली असून, निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाण्याची चिन्हे आहेत.


या जिल्ह्यांत होणार रणसंग्राम

  • पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर

  • अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, पुणे

  • सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया

  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

  • परभणी-हिंगोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड आणि छत्रपती संभाजीनगर-जालना.




राजकीय गणिते बदलणार!

विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून येतात. सध्या त्यातील १७ जागा रिक्त आहेत. या १७ जागांच्या निकालाचा थेट परिणाम विधान परिषदेतील पक्षीय बलाबलावर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पक्षाचे वर्चस्व राहिले आहे, त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी नवे सदस्य निवडून आल्यास सभागृहात आपली ताकद वाढवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, अनेक दिग्गज नेते आणि इच्छुकांनी आतापासूनच पक्षश्रेष्ठीं घरच्या वाऱ्या सुरू केल्या असून, काही मतदारसंघांत उमेदवारीवरून अंतर्गत चुरस निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''