Nitesh Rane : जिहाद्यांची बाजू घेणारा इम्तियाज जलील लवकरच तुरुंगात दिसेल!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनावरही केली बोचरी टीका


मुंबई : "राज्यात जिहादी प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही. निदा खान प्रकरणात सातत्याने जिहादची पाठराखण करणारा एमआयएमचा माजी खासदार इम्तियाज जलील हाच या प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड आहे. त्यामुळे त्याची जागा बाहेर नसून जेलमध्ये आहे. येत्या काही दिवसांतच त्याच्या अटकेचा नारळ फुटेल, असा दावा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी केला.



मुरुड येथे माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. निदा खान प्रकरणावर भाष्य करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "निदा खानला ज्या घरात आश्रय देण्यात आला होता, त्या घराचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. हे 'देवाभाऊंचे' सरकार आहे. महाराष्ट्रात जर कोणी 'जिहाद' करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर 'देवाभाऊंचा बुलडोझर' चालल्याशिवाय राहणार नाही."


इम्तियाज जलील यांच्या अटकेबाबत बोलताना ते म्हणाले की, मंत्री संजय शिरसाट यांनी केलेली मागणी रास्त आहे. 'महाराष्ट्र को हरा कर देंगे' अशी प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या जलील यांनी सातत्याने जिहादी मानसिकतेची बाजू घेतली आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर येण्यासाठी त्यांची अटक आवश्यक असल्याचे राणे यांनी नमूद केले.




आव्हाडांचे आंदोलन म्हणजे 'शोबाजी'

इंधनाचा वापर कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून आंदोलन केले होते. याविषयी विचारले असता राणे म्हणाले की, "पंतप्रधानांनी हे आवाहन कोणत्याही पक्षाचा नेता म्हणून नव्हे, तर देशाचे प्रमुख म्हणून केले होते. भविष्यात परकीय चलन साठा (फॉरेक्स) आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचे संकट लक्षात घेता हे पाऊल उचलले आहे. मात्र, यात देशहिताऐवजी राजकारण शोधणे दुर्दैवी आहे. घोड्यावरून फिरून आंदोलन करणे ही मीडियासाठीची 'शोबाजी' असून, अशा कृत्यांमुळे आव्हाड स्वतःच्या भारतीय असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत."


मुरुडमध्ये नवीन जेट्टीचे उद्घाटन

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी कोकणातील विकासकामांचीही माहिती दिली. मुरुड येथील जुन्या जेट्टीमुळे पर्यटकांची आणि स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून तेथे नवीन सुसज्ज प्रवासी जेट्टी उभारण्यात आली आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण