Potter : कुंभार कारागिरांना आता नऊ महिने उचलता येणार माती

 विशेष 'क्लस्टर'चे निर्माण होणार; वीटभट्टी व्यवसायासाठी थेट पाच वर्षांसाठी सलग परवाना


मुंबई : कुंभार समाजाला आता व्यवसायासाठी वर्षातील नऊ महिने माती उपसा करण्याची मुभा देण्यात आली असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष क्लस्टर विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.मंत्रालयातील दालनात बुधवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली.
महसूलमंत्र्यांनी या समाजाच्या नऊ प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्यांना मंजुरी दिली. या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी जुन्या अध्यादेशांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामुळे कुंभार बांधवांना व्यवसायात येणाऱ्या प्रशासकीय अडचणी आता कायमच्या दूर होणार आहेत.


पिढीजात कुंभार कुटुंबांना विटा, कौले व इतर मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी वर्षाला ७०० ब्रासपर्यंत माती् विनामूल्य आणि कोणत्याही रॉयल्टीशिवाय (स्वामित्वधन) काढता येईल. ही माती काढण्यासाठीचा परवाना दरवर्षी ९ नोव्हेंबर ते ३० मे या ९ महिन्यांच्या कालावधीसाठी सलग दिला जाईल. नदी, नाले किंवा सरकारी पडीक जमिनीतून माती उपसा करताना अन्य कोणताही उद्देश नसेल, तर ७०० ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड आकारला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.




आधुनिक क्लस्टर आणि ५ वर्षांचा परवाना


कुंभार व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यासाठी पारंपरिक कामांची माहिती घेऊन विशेष व्यावसायिक क्लस्टर तयार केले जाणार आहेत. या क्लस्टरसाठी ५ वर्षांच्या करारावर जागा उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय, वीटभट्टी व्यवसायासाठी दरवर्षी परवानगी घेण्याची कटकट संपवून आता थेट ५ वर्षांसाठी सलग परवानगी दिली जाईल. हे परवाने पारदर्शकतेसाठी डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून दिले जातील.


वीज दरात सवलत मिळणार


कुंभार समाजाला व्यवसायासाठी विशेष प्रमाणपत्र देऊन वीज दरात सवलत देण्याबाबतही चर्चा झाली. कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर येथील वीज केंद्रांतून मोफत फ्लाय ॲश (राख) उपलब्ध करून दिली जाईल, तर नाशिक, भुसावळ आणि परळी केंद्रांत कुंभार समाजासाठी २० टक्के राख आरक्षित असेल. तसेच संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतिथी सर्व महसूल व वन विभागाच्या कार्यालयांत साजरी करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.