Amruta Fadnavis: इंधन बचतीसाठी अमृता फडणवीस यांचा पुढाकार

 कान्स फिल्म फेस्टिव्हलचा दौरा रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फ्रान्समधील 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चा आपला नियोजित दौरा रद्द केला आहे. "रेड कार्पेटवरील फॅशन आणि संधी पुन्हा मिळू शकते, परंतु देशहित आणि पंतप्रधानांचे आवाहन सर्वोच्च आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


कान्स चित्रपट महोत्सवासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि विशेषतः पारंपरिक हातमाग परंपरा जगासमोर मांडण्यासाठी अमृता फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी त्यांनी विशेष तयारीही केली होती. नाशिकमधील येवला येथील स्थानिक कारागिरांनी अत्यंत कौशल्याने आणि अनेक महिन्यांच्या अहोरात्र मेहनतीने त्यांच्यासाठी एक खास पारंपरिक पैठणी साडी विणली होती. महाराष्ट्राच्या या अस्मितेचे जागतिक मंचावर सादरीकरण होणार असल्याने डिझायनर्स आणि कारागिरांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, देश पातळीवरील इंधन बचतीच्या मोहिमेला बळ देण्यासाठी त्यांनी य
हा दौरा रद्द केला.



रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही!


दौरा रद्द करण्याच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, "देशहिताला आणि पंतप्रधानांच्या आवाहनाला प्राधान्य देणे हीच प्रत्येक नागरिकाची खरी जबाबदारी आहे. कान्ससारख्या जागतिक मंचावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा नक्कीच अभिमानाचा क्षण होता. मात्र, पंतप्रधानांनी देशातील सद्यस्थिती पाहता इंधन बचत आणि अनावश्यक परदेशी दौरे टाळण्याचे जे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देणे मी माझे कर्तव्य समजते. रेड कार्पेटची संधी भविष्यात पुन्हा मिळू शकते, पण देशाला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही!", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर