'Raja Shivaji' Movie : ‘राजा शिवाजी’ची विक्रमी घोडदौड! १७ व्या दिवशी तगडी कमाई, आता ‘सैराट’च्या रेकॉर्डवर नजर

मुंबई : रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक विक्रम मोडत आता नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. ‘वेड’नंतर ‘बाईपण भारी देवा’ या सुपरहिट सिनेमालाही मागे टाकत ‘राजा शिवाजी’ आता ‘सैराट’ला जोरदार टक्कर देताना दिसत आहे.


१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ११.३५ कोटी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर ठरण्याचा मान पटकावला. रिलीजच्या पहिल्या शनिवारी सिनेमाने १०.५५ कोटी रुपयांची कमाई केली, तर रविवारी तब्बल १२ कोटींचा गल्ला जमवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यासह ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणूनही ‘राजा शिवाजी’ने विक्रम आपल्या नावावर केला.



चित्रपटाची भारतातील निव्वळ कमाई पहिल्याच आठवड्यात ५७.७० कोटी रुपयांवर पोहोचली. विशेष म्हणजे पहिल्याच आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवला.


दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड कायम राहिली. ७५.१० कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईसह ‘राजा शिवाजी’ने ‘वेड’ चित्रपटाचा सर्वाधिक कमाईचा विक्रम मोडला. यानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत हा सिनेमा तिसऱ्या स्थानावर पोहोचला.


आता तिसऱ्या आठवड्यात ‘राजा शिवाजी’ने आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सुपरहिट सिनेमालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकत या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.



सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या रविवारी म्हणजेच १७ व्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ३.०५ कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई ८४.१५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.


विकिपीडियावरील माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’चे वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन १०४.९६ कोटी रुपये इतके झाले आहे. तर नेट कलेक्शन ८८.८५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामुळेच हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे.


‘राजा शिवाजी’ने आतापर्यंत तब्बल ५ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट, पहिल्या वीकेंडला सर्वाधिक गल्ला जमवणारा चित्रपट, पहिल्याच आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला मराठी चित्रपट, तसेच ‘वेड’ आणि ‘बाईपण भारी देवा’चे रेकॉर्ड मोडत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट असा हा विक्रमांचा सिलसिला सुरू आहे.


विशेष म्हणजे, हिंदी चित्रपटांशी तुलना केली असता २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘भूत बंगला’नंतर ‘राजा शिवाजी’ने तिसरे स्थान मिळवले आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’