BMC News : उपनगरातील महापालिकेच्या ५ रुग्णालयांमध्ये रक्तपेढ्या

- खासगी सहभाग तत्वावर रुग्णालयांमध्ये ब्लड बँककरता संस्थांची निवड


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये रक्त पेढ्यांची अर्थात ब्लड बँकची सुविधा नसल्याने आता कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, वांद्रे के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे, कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय, बोरीवली हरीलाल भगवती रुग्णालय या ५ उपनगरीय रुग्णालयांमध्ये रक्तविघटन सुविधेसह रक्तकेंद्र सुविधा सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रथम दहा वर्षांसाठी आणि पुढील नुतनीकरणानंतर दहा वर्षे अशाप्रकारे एकूण ३० वर्षांकरता या रुग्णालयांमध्ये खासगी संस्थेच्या माध्यमातून रक्त पेढ्या उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी रुग्णालयाची जागा भाडेकरारावर दिली जाणार आहे.



महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये सार्वजनिक खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणांतर्गत पाच रुग्णालयांमध्ये रक्तपेढ्यांसाठी जागा खासगी संस्थेला दिली जाणार असून खासगी संस्थेच्या माध्यमातून रक्त पेढ्या चालवण्यासाठी महापालिकेच्यावतीने संस्थांची निवड करण्यात आली आहे. कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथील पहिला मजल्यावरील ए विंग मधील २२६.४९८ चौ.मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा, ४१,२७,६७५ रुपये प्रति वर्ष याप्रमाणे मे. नवजीवन मेडीकल रिलीफ अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय नवीन इमारतीमधील पहिला मजल्यावरील २४८.८८७ चौ.मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा, ३४,२९,६५५ रुपये प्रति वर्ष नवजीवन मेडीकल रिलीफ अॅड रिसर्च फाऊंडेशन संस्थेला तर कुर्ला के. बी. भाभा रुग्णालय येथील सहाव्या मजल्यावरील २३५.०० चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा, २१,०९,६९५ रुपये प्रति वर्ष प्रमाणे नवजीवन मेडीकल रिलीफ अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला देण्यात येत आहे.



तर वांद्रे भाभा रुग्णालयातील सहाव्या मजल्यावरील २९५.०० चौ.मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा, या रक्तपेढीकरता २६.६१.१३० रुपये प्रति वर्ष चक्रेश्वर मेडिकल फाऊंडेशन यांसंस्थेला आणि बोरीवलीतील हरीलाल भगवती रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील ३१०.५५ चौ.मी. एवढ्या क्षेत्रफळाची जागा, रक्तपेढीकरता ३२,०९,७६५ रुपये प्रति वर्ष याप्रमाणे नवजीवन मेडीकल रिलीफ अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला करार केल्याच्या दिनांकापासून प्रथम दहा वर्षांकरिता व नंतर सेवा समाधानकारक असल्यास पुढील दहा अधिक दहा वर्षांसाठी नूतनीकरण्यासापेक्ष अशा एकूण ३० वर्षाकरिता देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सुधार समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Mumbai Fire News : साकीनाका परिसरात भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Mumbai Fire News: अंधेरी येथील साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे मंगळवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन

Mumbai : पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांसह 4 जणांना अटक; शस्त्र मुंबईत आणल्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या कथित गोळीबार प्रकरणाच्या तपासात दिल्ली

Mumbai Viewing Gallery : मुंबईत समुद्र किनारी तिसरी व्ह्युईंग गॅलरी बनणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांसह पर्यटकांना समुद्राचे विलोभनीय

WEH Toilet Project : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बनवणार तीन आकांक्षी शौचालय

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्यावतीने आता आकांक्षी शौचालय शहरापाठोपाठ पश्चिम उपनगरांत बांधले जाणार आहे.

BMC Waste Management : मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्रांच्या प्रकल्पांना आता प्रतिसाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबईतील राडारोडा वाहतूक आणि विल्हेवाटीच्या महापालिकेच्या प्रकल्पाला आता