Lahore Roads Renamed : लाहोरमध्ये मोठा बदल! अनेक रस्त्यांचे नामकरण; अनेक रस्त्यांना फाळणीपूर्वीची जुनी नावं पुन्हा एकदा बहाल

लाहोर : पाकिस्तानमधील लाहोर शहरात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब प्रांतीय सरकारने लाहोरमधील अनेक रस्ते आणि परिसरांना फाळणीपूर्वीची मूळ नावं पुन्हा देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हिंदू आणि शीख वारशाशी संबंधित अनेक ऐतिहासिक नावांचं पुनरागमन होत आहे. (Lahore Roads Renamed)


ही मोहीम ‘लाहोर हेरिटेज एरियाज रिव्हायव्हल प्रोजेक्ट’ अंतर्गत राबवण्यात येत असून, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पुढे आला आहे. १९४७ च्या फाळणीनंतर हिंदू आणि शीख संस्कृतीशी संबंधित अनेक रस्ते, चौक आणि भागांची नावं बदलून इस्लामी किंवा राष्ट्रवादी स्वरूपाची करण्यात आली होती. आता त्यातील अनेक ऐतिहासिक नावं पुन्हा बहाल केली जात आहेत. (Lahore Roads Renamed)



पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्थानिक प्रशासनाने नव्या फलकांची उभारणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. (Lahore Roads Renamed)



पुन्हा बहाल करण्यात आलेली काही महत्त्वाची नावं पुढीलप्रमाणे :


- इस्लामपुरा पुन्हा ‘कृष्णनगर’
- बाबरी मशीद चौक आता पुन्हा ‘जैन मंदिर चौक’
- सुन्नत नगरचं नाव पुन्हा ‘संत नगर’
- मुस्तफाबाद आता पुन्हा ‘धरमपुरा’
- मौलाना जफर अली खान चौक पुन्हा ‘लक्ष्मी चौक’ (Lahore Roads Renamed)



याशिवाय काही ब्रिटिशकालीन नावंही पुन्हा बहाल करण्यात आली आहेत.


- सर आगा खान रोडचं नाव पुन्हा ‘डेव्हिस रोड’
- फातिमा जिन्ना रोड आता पुन्हा ‘क्वीन्स रोड’
- बाग-ए-जिन्ना पुन्हा ‘लॉरेन्स गार्डन्स’
- ग्रेटर इक्बाल पार्कचं नाव पुन्हा ‘मिंटो पार्क’ करण्यात येणार आहे. (Lahore Roads Renamed)


तसेच क्विन्स रोड, जेल रोड, लॉरेन्स रोड, एम्प्रेस रोड, कृष्णनगर, संतनगर, धरमपुरा, राम गल्ली, लक्ष्मी चौक, जैन मंदिर रोड, मोहनलाल बाजार, भगवानपुरा आणि शांतिनगर यांसारख्या अनेक भागांची ऐतिहासिक ओळख पुन्हा जिवंत केली जात आहे. (Lahore Roads Renamed)



याशिवाय नवाज शरीफ यांनी लाहोरमधील ऐतिहासिक क्रिकेट मैदानं आणि जुनं कुस्ती मैदान पुन्हा सुरू करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे लाहोरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला नवसंजीवनी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. (Lahore Roads Renamed)

Comments
Add Comment

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही