NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणाचे विदर्भात पडसाद; अमरावतीही सीबीआयच्या रडारवर?

अमरावती : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता थेट विदर्भापर्यंत जाऊन पोहोचला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने या प्रकरणाची महाराष्ट्रातील तपासाची व्याप्ती वाढविली आहे. नांदेड, लातूर, नाशिक आणि पुणे येथील कारवाईनंतर आता थेट नागपूर आणि चंद्रपूर येथे छापे टाकण्यात आल्याने अमरावतीतही खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak Case)


मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीसह विदर्भातील काही शहरांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले असून, येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी (१९ मे) सकाळी सीबीआयच्या पथकाने नागपूरच्या गणेशपेठ आणि कोतवाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकले. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची चौकशी करण्यात आली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका विद्यार्थ्याच्या घरीही तपास करण्यात आला. प्राथमिक तपासात हे तिन्ही विद्यार्थी लातूरमधील प्रसिद्ध कोचिंग संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.  (NEET Paper Leak Case)



या घडामोडींनंतर राज्यभरातील प्रवेश एजन्सी, कोचिंग क्लासेस आणि संशयित दलालांच्या हालचालींवर तपास यंत्रणांनी बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या अमरावतीत मोठ्या प्रमाणावर नीट आणि स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कोणते धागेदोरे येथेही सापडतात का, याची पडताळणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (NEET Paper Leak Case)



३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या तब्बल ४२ तास आधी काही कोचिंग संस्थांकडे प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने पाच राज्यांत छापे टाकून १० आरोपींना अटक केली आहे. कोचिंग ऑपरेटर, प्रवेश एजन्सी आणि प्रश्नपत्रिका खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, पुणे, नाशिक, लातूर आणि अहिल्यानगरसह विविध शहरांत तपास मोहीम सुरू आहे.अमरावतीतील कोचिंग संस्थांमध्ये सध्या अस्वस्थतेचे वातावरण असून, तपासाच्या हालचालींमुळे शैक्षणिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. (NEET Paper Leak Case)

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि