BJP : केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त भाजपचे महासंपर्क अभियान

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष देशभरात महिनाभर व्यापक जनसंपर्क मोहीम राबविणार आहे. हा उपक्रम ९ जूनपासून सुरू होऊन ९ जुलैपर्यंत चालणार आहे. पक्षाने या राष्ट्रव्यापी मोहिमेसाठी '१२ वर्षे, १२ मोठ्या कामगिरी' ही संकल्पना निश्चित केली आहे.


या मोहिमेदरम्यान केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी जाहीर सभा, पत्रकार परिषदा, आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या मोहिमेत अगदी बूथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग निश्चित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) नुकत्याच राबवलेल्या गृहसंपर्क मोहिमेच्या धर्तीवरच भाजप हा उपक्रम चालवणार आहे.


प्रत्येक बूथ पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन


या मोहिमेदरम्यान गावे, वस्त्या आणि शहरी वसाहतींमध्ये 'विकसित भारत संकल्प सभा' आयोजित केल्या जातील. यामध्ये सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे झालेले सकारात्मक परिणाम जनतेसमोर मांडले जातील. प्रत्येक बूथ क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करणे आणि 'पन्ना प्रमुख' यांनी आपापल्या भागातील मतदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधणे, असे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना कामाला लावणे, या दृष्टीने भाजप या मोहिमेकडे पाहत आहे.


मंत्रालयांकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने सर्व मंत्रालयांना त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख कामगिरीवर आधारित सविस्तर अहवाल आणि लहान माहितीपुस्तिका तयार करण्यास सांगितले आहे, ज्या सर्वसामान्यांमध्ये वाटल्या जातील. याशिवाय एक मुख्य पुस्तिका देखील तयार केली जात आहे, ज्यामध्ये सरकारच्या मोठ्या यशाचा समावेश असेल.


या मुद्द्यांवर भर
कलम ३७० हटवणे आणि सर्जिकल स्ट्राईक
बालाकोट एअर स्ट्राईक आणि नक्षलवादावरील कडक कारवाई
डिजिटल इंडिया, जीएसटी सुधारणा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार
किसान सन्मान निधी, लखपती दीदी योजना आणि कोव्हिड व्यवस्थापन व लसीकरण मोहीम
संरक्षण उत्पादनांचे स्वदेशीकरण
अयोध्येतील राम मंदिर निर्मिती आणि 'ऑपरेशन सिंदूर'
या सर्व महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि जनकल्याणकारी निर्णयांना या देशव्यापी महासंपर्क मोहिमेचा मुख्य भाग बनवले जाणार आहे.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण