Metro 3 मध्ये मोबाईल नेटवर्कबाबत भेडसावणाऱ्या समस्या दूर होणार

मुंबई : मुंबई मेट्रो रेल मर्यादित (एमएमआरसी) मेट्रो-३ (अॅक्वा लाईन) मार्गिकेवरील मोबाईल नेटवर्क सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीचे अधिकार प्रदान केले आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना मोबाईल नेटवर्कबाबत भेडसावणाऱ्या समस्या दूर होणार आहेत.



भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना भूमिगत स्थानके व बोगद्यांमध्ये आयबीएस प्रणाली उभारणे, संचालन व देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा अखंड व्हॉइस व डेटा कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळणार असून सर्व दूरसंचार सेवा प्रदाते लवकरच स्थानके व बोगद्यांमध्ये सिग्नल सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, अखंड आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.



भुयारी प्रवासात इंटरनेट नसल्यामुळे प्रवाशांना 'मेट्रो ॲप'द्वारे ई-तिकीट काढताना किंवा युपीआय पेमेंट करताना प्रचंड अडचणी येत आहेत.सुरक्षा आणि संपर्क: मेट्रो मार्ग जमिनीखाली सरासरी १८ मीटर खोल आहे. अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत नातेवाईकांशी संपर्क साधणे कठीण होत आहे. प्रवासादरम्यान कार्यालयीन कामे किंवा मनोरंजनासाठी इंटरनेट वापरणे शक्य होत नाही.
Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म