Nashik : विवाहितकडे शरीरसुखाची मागणी करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नाशिक शहरात खळबळ

Nashik : नाशिक शहराला नेमकी कोणाची नजर लागली हा प्रश्न आता नाशिकरांना पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या गंभीर प्रकरणात नाशिक शहर राज्यात मोठ्या चर्चेत आहे. अशातच आता नाशिक शहरातील पंचवटी येथे गंभीर प्रकरण समोर आले आहे. मखमलाबाद रोडवरील जाधव कॉलनी परिसरात एका संशयिताने जुन्या ओळखीचा फायदा घेत थेट महिलेच्या घरात घुसून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.


नेमकं प्रकरण काय ?


मिळलेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिक शहरातील मखमलाबाद रोडवरील जाधव कॉलनी परिसरात हा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत एका संशयिताने तिच्या घरात घुसून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तसेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चाकूचा धाक दाखवत तिला आणि तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली.



पुढे त्याने पीडितेला धमकावत म्हटलं की, "तुला दोन दिवसांची मुदत देतो, तुझी काय इच्छा आहे ते मला सांग." असे बोलून तो घटनास्थळावरून पसार झाला. या भयानक प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड घाबरली. तिला मानसिक धक्का बसला. यातून तिने घरात असलेलं फिनाईल पिऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.


हा प्रकार लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने रुग्णालयात दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी संशयित जय गणेश कोठुळे (वय २८, रा. दत्तनगर, पेठरोड, पंचवटी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



तुझ्याकडे मोठ्या अपेक्षेने आलो आहे, नाही म्हणू नकोस


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही दोन ते तीन वर्षांपूर्वी संशयित जय कोठुळे याच्या ऑफिसमध्ये कामाला होती. या जुन्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीनं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास विवाहित महिला घरात एकटीच होती. तिची दोन्ही मुलं घराबाहेर खेळायला गेली होती. घरात कुणी नसल्याचं हेरून संशयित जय कोठुळे हा जाधव कॉलनी परिसरातील पीडितेच्या घरात प्रवेश करताच त्याने थेट स्वयंपाकघरातील भाजी कापण्याचा चाकू हातात घेतला आणि पीडितेच्या जवळ गेला.


संशयित आरोपीने पीडितेला सोफ्यावर ढकलून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच "मी तुझ्याकडे मोठ्या अपेक्षेने आलो आहे, तू मला नाही म्हणू नकोस. जर तू नकार दिलास तर तुझ्या दोन्ही मुलांना ठार करेल. अशी धमकीही दिली. दरम्यान या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित जय कोठुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.