Women Property Rules : माहेर की सासर? महिलेच्या मृत्यूनंतर संपत्ती कुणाला मिळते, जाणून घ्या नियम

मुंबई : एखाद्या विवाहित हिंदू महिलेचं मृत्यूपत्र (Will) न करता निधन झालं आणि तिच्यामागे पती किंवा मुलं जिवंत नसतील, तर तिच्या संपत्तीवर (Property) नेमका कुणाचा हक्क असतो? अनेकांना वाटतं की अशा परिस्थितीत महिलेची संपत्ती तिच्या आई-वडिलांना मिळेल. मात्र, हिंदू उत्तराधिकार अधिनियमातील तरतुदी वेगळंच चित्र दाखवतात. महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार हे ती संपत्ती तिला कशा प्रकारे मिळाली होती यावर अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात वारसाहक्काचे नियम वेगळे लागू होऊ शकतात.



स्वतःच्या कमाईतून घेतलेल्या संपत्तीचं काय?


महिलेने स्वतःच्या कमाईतून मालमत्ता खरेदी केली असेल किंवा तिला ती इतर कोणत्याही मार्गाने मिळाली असेल, तर सर्वप्रथम त्या संपत्तीवर तिच्या पती आणि मुलांचा हक्क असतो. मात्र, पती आणि मुलं दोघेही नसल्यास ही संपत्ती महिलेच्या आई-वडिलांकडे न जाता तिच्या पतीच्या कायदेशीर वारसांकडे जाते. यामध्ये सासू-सासरे, दीर किंवा पतीच्या कुटुंबातील इतर वारसांचा समावेश होऊ शकतो. महिलेच्या आई-वडिलांचा क्रम त्यानंतर येतो.


आई-वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीबाबत नियम वेगळे


जर महिलेला संबंधित संपत्ती तिच्या आई-वडिलांकडून वारशाने मिळाली असेल, तर पती किंवा मुलं नसल्यास ती मालमत्ता पुन्हा तिच्या माहेरच्या वारसांकडे जाते. अशा परिस्थितीत पतीच्या कुटुंबाचा त्या संपत्तीवर कोणताही हक्क राहत नाही.



पती किंवा सासऱ्याकडून मिळालेल्या संपत्तीचं काय?


महिलेला तिच्या पतीकडून किंवा सासऱ्याकडून मालमत्ता मिळाली असेल, तर तिच्या मृत्यूनंतर पती आणि मुलं नसल्यास ती संपत्ती पतीच्या कायदेशीर वारसांकडेच जाते. अशा वेळी माहेरच्या वारसांना त्या संपत्तीवर अधिकार मिळत नाही.


पुरुष आणि महिलांच्या वारसाहक्कातील फरक


सध्याच्या कायद्यानुसार, एखाद्या हिंदू पुरुषाचं मृत्यूपत्र न करता निधन झाल्यास त्याची आई वारसांच्या पहिल्या श्रेणीत येते. मात्र, महिलेच्या बाबतीत तिचे आई-वडील वारसाहक्काच्या क्रमवारीत नंतर येतात. या तरतुदीवर अनेकदा टीका झाली असून, या संदर्भातील मुद्दे सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित आहेत.



महिलांसाठी मृत्यूपत्र (Will) का महत्त्वाचं?


कायदे तज्ज्ञांच्या मते, महिलांनी वेळेवर मृत्यूपत्र (Will) तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः अविवाहित (Unmarried), विधवा (Widow), घटस्फोटित (Divorcee) किंवा ज्यांच्यावर त्यांच्या आई-वडिलांची आर्थिक जबाबदारी आहे अशा महिलांनी आपली संपत्ती इच्छेनुसार योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचावी यासाठी मृत्यूपत्र तयार करून ठेवणं गरजेचं आहे. यामुळे भविष्यातील कायदेशीर वाद टाळण्यास मदत होऊ शकते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण