Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून नीलम शिर्केंची माघार

मुंबई : 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के-सामंत यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागले. मंत्र्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणा राबवली जात असल्याचा आरोप शिउबाठाच्या सुषमा अंधारे यांनी केला. यानंतर अचानक नीलम शिर्के यांनी एक पत्रक काढून निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यांनी निवडणुकीत उभ्या असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि मावळत्या संचालिका वर्षा उसगांवकर यांना पाठिंबा जाहीर केला. आता उद्या म्हणजेच मंगळवार २६ मे २०२६ रोजी या संदर्भातली कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नीलम शिर्के यांच्या खेळीमुळे विरोधकांच्या हातातील सर्वात मोठा मुद्दा गायब झाला आहे. निवडणुकीचे समीकरण बदलले आहे.




 

 

तब्बल १० वर्षांनंतर 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'ची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत १७ जागांसाठी ३४०३ मतदार मतदान करणार आहेत. सुरुवातीला विजय पाटकर विरुद्ध मेघराज राजेभोसले असे चित्र होते. पण आपला अर्ज कोल्हापूरला पोहोचूच नये यासाठी राजकारण झाल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केला. एका मंत्र्याचे ओएसडी कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत आणि मतदारांवर दबाव आणत आहेत, असेही ते म्हणाले. यानंतर शिउबाठाच्या सुषमा अंधारे यांनी अचानक मंत्र्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणा राबवली जात असल्याचा आरोप केला. आरोप करणाऱ्यांनी एकही पुरावा दिला नाही. पण आरोपांचा धुरळा उडू लागल्यावर पुढे काय होणार यावरून चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर नीलम शिर्के यांनी एक पत्रक काढून निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.



मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के-सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेत ज्येष्ठ अभिनेत्री आणि 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या मावळत्या संचालिका वर्षा उसगांवकर यांना पाठिंबा जाहीर केला. तर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सामंत कुटुंबियांची बाजू घेत राजकीय आरोप फेटाळले.


नीलम शिर्के-सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील पडद्यामागचे नाट्य संपले आहे. आता पुढे काय घडते याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

3 Idiots Sequel : '3 इडियट्स'चे त्रिकुट परतणार; राजकुमार हिरानींचे संकेत

मुंबई : आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेला २००९ मधील सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'च्या

Jailer 2 release date : ‘जेलर २’ चित्रपट १५ ऑक्टोबरलाच होणार रिलीज; पुढे ढकलण्याच्या अफवांवर निर्मात्यांचा पूर्णविराम

सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांच्या बहुप्रतिक्षीत ‘जेलर २’ (Jailer 2) या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत गेल्या काही

Nikki Arbaz Breakup : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचा ब्रेकअप? अखेर सगळं सत्य समोर

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या 5 व्या सीझनमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली

Janhavi Killekar New Brand : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सुरू केला नवा प्रवास; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

मुंबई : जान्हवी किल्लेकरच्या चाहत्यांसाठी खास बातमी! ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आता

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच