भाजपची पडद्याआडून ‘बविआ’शी चर्चा

ठाणे जिंकण्यासाठी घडामोडींना वेग; हितेंद्र ठाकुरांच्या ७१ नगरसेवकांचा ‘भाव’ वाढला

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच, ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण रंगात आले आहे. ठाण्याची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्याबाबत महायुतीत अनुकूलता असल्याचे संकेत मिळत असतानाच, आता भाजपने ही जागा स्वतःकडे खेचण्यासाठी पडद्याआड वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपच्या या ‘प्रेशर टॅक्टिक्स’मुळे वसई-विरारमध्ये मजबूत पकड असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) ७१ नगरसेवकांचा ‘भाव’ चांगलाच वधारला आहे.


संख्याबळाचा विचार करता ठाणे विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड आहे. असे असतानाही, ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने आणि त्यांचे निकटवर्तीय रवींद्र फाटक हे या जागेचे प्रतिनिधित्व करत असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. या जागेसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी रवींद्र फाटक यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘बविआ’चे सर्वेसर्वा भाई ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फाटक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती.परंतु, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आता या जागेसाठी कमालीचा आग्रह धरला आहे. "जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी हीच योग्य वेळ आहे. एवढे नगरसेवक असूनही आता आमदार निवडून आणला नाही, तर कधी आणणार?" असा सूर भाजपमधून उमटू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी ‘बविआ’चे माजी महापौर राजीव पाटील यांची गुप्त भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या भेटीत भाजपने ‘बविआ’कडे विधानपरिषद निवडणुकीत सहकार्याची विनंती केल्याचे समजते.


संख्याबळाचे गणित काय?

गेल्या काही वर्षांत भाजपने ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आपली ताकद लक्षणीयरित्या वाढवली आहे. सध्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे तब्बल ४४४ मतदारांचे (नगरसेवक व लोकप्रतिनिधी) संख्याबळ आहे, तर शिवसेनेकडे ३४६ मते आहेत. त्यामुळे स्वबळावरही भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. परंतु, ‘बविआ’ची ७१ मते निर्णायक ठरणार आहेत. जर ही ७१ मते शिवसेनेच्या बाजूने वळाली आणि त्यांनी इतर छोट्या घटकांची जुळवाजुळव केली, तर शिवसेना भाजपला कडवे आव्हान देऊ शकते. त्यामुळेच सध्या ठाण्याच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी ‘बविआ’ केंद्रस्थानी आली असून, हितेंद्र ठाकूर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

Maratha Reservation : आरक्षण तिढा हे सगळं शरद पवारांचे पाप - विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. त्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका; जॉन्टी ऱ्होड्सचा बीसीसीआयला मोलाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या भविष्याबाबत आ

Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात मंत्री नितेश राणेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने वेधले अनेकांचे लक्ष

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ आता केंद्रीय अन्वेषण

India A : न्यूझीलंड दौऱ्यावर भारत 'अ' संघ तीन चार-दिवसीय सामने खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघाचा २४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारा महत्त्वपूर्ण दौरा, युवा क्रिकेटपटूंना

ICC Test Rankings : गिल-बुमराहच्या क्रमवारीत घसरण, पडिक्कलची मोठी झेप

दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची घसरण झाली

Krunal Pandya : भारताच्या टी२० संघातून वगळल्यानंतर कृणाल पांड्या निराश

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघाच्या घोषणेपूर्वी, एका