Nashik : पैशांची हाव संपेना, एक लाखाची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक ताब्यात

Nashik : अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिकमधून (Nashik) ताब्यात घेतले आहे. पदोन्नती मिळून बदली झाल्यानंतरही एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे (Police Sub-Inspector Jayesh Gangurde) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हा अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) कार्यरत होता. पदोन्नतीनंतर त्याची अहिल्यानगरमधून नाशिकला बदली झाली. तक्रारदाराचे मामा व इतर १५ आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात ११ मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे याच्याकडे होता. या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी आणि नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी गांगुर्डे याने सुरुवातीला २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.


या विरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Department) तक्रार दिली. विभागाच्या पथकाने पंचासमक्ष या तक्रारीची पडताळणी केली. शहरातील पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या संभाषणादरम्यान गांगुर्डे याने तडजोडीअंती एक लाख रुपये लाच घेण्याचे मान्य केले. लाचेची रक्कम पोलीस मुख्यालय परिसरात स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. त्याने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नाशिकमधून ताब्यात घेऊन नगरला आणण्यात आले.



आठ दिवसांपूर्वीच सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती


आठ दिवसांपूर्वीच नाशिक येथे उपनिरीक्षक गांगुर्डे याची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली होती. पदोन्नतीनंतर त्याला कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. अहिल्या नगर शहरातील पोलीस मुख्यालयात (Police Headquarters AhilyaNagar) सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी त्याला पाठविण्यात आले होते. तेथे त्याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. त्यामुळे त्यांनी तक्रारदाराला मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बोलावून घेतली होते. हा प्रकार सुरू असतानाच दरम्यान, त्याला मंगळवारी तालुका पोलीस ठाण्यातून (Ahilyanagar Taluka Police Station) कार्यमुक्त करण्यात आले आणि काल, बुधवारी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Department)  पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजू आल्हाट, अंमलदार चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ यांच्या पथकने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल