Crime : तुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना ? 'याठिकाणी' २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जळगाव : अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) भवरखेड येथील बनावट दूध निर्मितीवर कारवाई करत २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे. जळगाव कार्यालयास प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे २७ मे २०२६ रोजी भवरखेड, ता. धरणगाव येथे बनावट दूध निर्मिती करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आलीय.


याप्रकरणात सोमनाथ आनंदा माळी (वय ३०) यास खाद्य तेलाचा वापर करून बनावट दूध तयार करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. तपासणीदरम्यान रिफाइन्ड पामोलीन तेलाचा (Refined Palmolein Oil) वापर दुधातील वसा (फॅट) वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात (Dharangaon Police Station) गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




६६ लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट


अन्न व औषध प्रशासनाच्या (Food and Drug Administration Department)  या कारवाईत दोन गाईच्या दुधाचे तसेच एक खाद्यतेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. तसेच उर्वरित अंदाजे २६६ लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा पंच भवरखेडेचे पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी सोमनाथ आनंदा माळी याने लघुशंकेसाठी जात असल्याचे कारण देत घटनास्थळावरून पळ काढला. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये २८ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




यापूर्वीही आरोपीवर कारवाई


विशेष म्हणजे, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वीही दुधात भेसळ केल्याप्रकरणी पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली होती. त्या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात (Dharangaon Police Station) प्रथम खबरी अहवाल दि. २९ जुलै २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित व्यक्ती वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, भा.प्र.से. तसेच सह आयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे, नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे, शरद पवार व आकाश बोहाडे यांनी सहभाग घेतला. परिसरात कुठेही बनावट दूध अथवा अन्न भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा