छगन भुजबळ आणि माझ्यात वाद नाहीत - सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात खडाजंगी झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असतानाच, या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर येत वादाच्या या सर्व चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. "आमच्यात कोणताही वाद झालेला नाही, आम्ही एकत्र आहोत आणि 'हम साथ साथ है'," असे सांगत छगन भुजबळ यांनी पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी किंवा राडा झाला नसल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनीही या केवळ वावड्या असून लोकशाही मार्गाने पक्षात विविध विषयांवर चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे सांगत वादाच्या वृत्तावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची, मंत्र्यांची आणि आजी-माजी आमदारांची विधानपरिषद निवडणुका आणि पक्षाच्या बांधणीसंदर्भात एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार आणि कार्यकर्त्यांच्या निधी वाटपावरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले होते. तटकरे यांनी आपल्या मनात साचलेला सगळा राग बाहेर काढत भुजबळांना थेट ऐकवले, तर भुजबळांनीही त्याला रोखठोक प्रत्युत्तर दिल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.


बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी नेहमीच्या शैलीत या चर्चा फेटाळल्या. "बैठकीत अजिबात वाद झालेला नाही. आमदारांना निधी वाटप कसा करायचा, रस्ते आणि इतर विकासकामांबाबत सगळ्यांना कसा न्याय मिळेल, यावर सकारात्मक चर्चा झाली. काही विषयांवर बोलताना मी फक्त एवढंच म्हणालो की, उगीच इकडेतिकडे न भरकटता थेट मुद्द्याचं बोला. याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही. महामंडळांच्या अ, ब, क अशा वर्गीकरणावरही आमचे नेते निर्णय घेतील. पक्षात 'एकला चलो रे'चा नारा दिला गेल्याची आवई उठवली जात आहे, ती पूर्णपणे चुकीची असून उगीच अफवा पसरवू नका," असे आवाहन भुजबळांनी केले.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी